कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम येथील निसर्गरम्य परिसरामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून 28 निरपराध हिंदू पर्यटकांवर जो भ्याड हल्ला झाला त्यामध्ये निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत.आपल्या मुलाबाळांसमोर आपल्या पतीला कोणी गोळ्या घालत असेल तर यापेक्षा दुर्दैव आणि दुःख जगामध्ये दुसरं कोणतं नाही. या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कोल्हार येथे व्यापारी तसेच सर्वपक्षीय सर्वधर्मीय निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान निषेध सभा होईपर्यंत गावात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. याप्रसंगी कोल्हार बुद्रुकची माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील यांनी भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला.गेली अकरा वर्ष तुमचे सरकार असून देखील दर सहा महिने किंवा एक वर्षाने मोठा अतिरेकी हल्ला होत असल्याचे निरीक्षण त्यांनी यावेळी नोंदविले तसेच हे आपल्या गुप्तचर यंत्रणेचे मोठे अपयश असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले . तरी देखील याप्रसंगी कोणी राजकारण न करता किंवा हिंदू-मुस्लीम असा वाद न करता आपण सर्वांनी जागरूक राहून हिंदू मुस्लिम ऐक्य दाखवून या अतिरेक्यांविरुद्ध सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून दहशतवादाला सडेतोड उत्तर देऊ असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
तसेच नागरिकांनी शहानिशा केल्याशिवाय सोशल मीडियावर कोणतेही मेसेज व्हायरल करू नये की ज्यामुळे समाज माध्यमांवर त्याचे वाईट परिणाम होतील. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना शहिदांचा दर्जा द्यावा असे विनंती त्यांनी भारत सरकारला करून त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली. याप्रसंगी पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे यांनी देखील आपले परखड मत व्यक्त केले आपल्याला धोका पाकिस्तानपासून नसून आपल्यातीलच असलेल्या गद्दारांपासून आहे व हे गद्दार कोण हे ओळखण्यासाठी सदैव जागरुख रहा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त करून पीडित कुटुंबीय प्रति संवेदना व्यक्त केली.
कोल्हारचे ज्येष्ठ नागरिक इलियास भाई शेख यांनी देखील पाकिस्थान पुरस्कृत अतिरेक्यांना भारत सरकारने चांगलाच धडा शिकवून त्यांना यमसधनी पाठवावे किंवा वेळप्रसंगी पाकिस्तानला देखील नेस्तनाबूत करून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा तसेच ज्यामुळे गावातील वातावरण दूषित होईल अशा खोट्या अफवा पसरू नये व कोणीही या अफवांवर विश्वास ठेवू नये असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांपप्रती संवेदना व्यक्त केली. कोल्हार टपरीधारक संघटनेचे अध्यक्ष व अपंग संघटनेचे तालुकाप्रमुख कुमार जंगम यांनी देखील या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला तसेच यामागे मोठा कूटनीती डाव असून भारतभरामध्ये हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा कोटी डाव असल्याचे सांगून आपले हिंदू मुस्लिम ऐक्य या अतिरेक्यांना दाखवून त्यांचा डाव हाणून पाडावा असे आवाहन त्यांनी यावेळी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना केले. तसेच कोल्हार मधील सर्व मुस्लिम बांधवांनी विशेष करून नमाज च्या वेळेस तसेच दिवसभर हाताला काळी पट्टी बांधून निषेध केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच या भ्याड हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी कोल्हार भगवतीपुर सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव दळे, पद्मश्री विखे कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर खर्डे, संभाजी देवकर,, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख अनिल बांगरे व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी, श्रीकांत बेंद्रे, श्याम गोसावी, अरुण जोशी, सचिन शिरसाट, केतन लोळगे, अरुण बोरुडे, कॉम्रेड सुरेश पानसरे बब्बा भाई शेख, जावेद सर, सुनील बोरुडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. तर याप्रसंगी कोल्हार भगवतीपुरचे सरपंच दत्तात्रय राजभोज उपसरपंच प्रकाश खर्डे देवालय ट्रस्टचे विश्वस्त विजय निबे, विखे कारखान्याचे संचालक बापूसाहेब कडसकर, धनंजय दळे, पंढरीनाथ खर्डे, नागपूर पशु व मत्स्य विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य ऋषिकेश खांदे अक्षय मोरे, साईनाथ खर्डे,आबा खर्डे, गोरक्ष खर्डे, मयूर कडसकर, अनिल हिरानंदानी, स्वप्निल लोखंडे, अतुल राका, आशुतोष बोरसे, आसिफ शेख शोभा लोखंडे आदी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
भविष्यात असे हल्ले होऊ नये म्हणून या घटनेची सखोल चौकशी व्हावी व त्वरित प्रतिबंधात्मक पावले उचलावे या मागणीचे निवेदन पत्र लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवराम वनवे यांच्याकडे कोल्हार भगवतीपुर ग्रामस्थ व व्यापाऱ्यांच्यावतीने देण्यात आले.



