श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- दिनांक १ जुलै २०२३ रोजी वसंत नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेल्या वसंतराव नाईक कृषी पुरस्कार- २०२३ वितरण समारंभामध्ये, यशवंत चव्हाण केंद्र, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमांमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत प्रतिभा लोकसंचालित साधन केंद्र संचालित श्रावणी महिला बचत गट कोल्हार या महिला बचत गटास ” राज्यस्तरीय उत्कृष्ट पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय पुरस्कार ‘ मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये शाल, श्रीफळ, ५१ हजार रुपये व सन्मान चिन्ह मिळाले.



