लोणी दि.२०( जनता आवाज वृत्तसेवा ):-
लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या “इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल ” विभागाच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या पाच विद्यार्थ्यांची इमर्सन एक्सपोर्ट इंजिनिअरिंग सेंटर., नाशिक व जॉन्सन कंट्रोल., पुणे’ या बहुराष्ट्रीय कंपण्यामध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करून ५.६० लाखांपर्यंत पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून दिल्याने महाविद्यालयाचे परिसरातून कौतुक होत आहे, अशी माहीती प्राचार्य डाॅ. संजय गुल्हाने यांनी दिली.
यामध्ये प्राजक्ता मोटे, भैरवी राऊत, निरंजना कडू आणि ऋषिकेश मोरे या विद्यार्थ्यांची ‘इमर्सन एक्सपोर्ट इंजिनिअरिंग सेंटर., नाशिक’ आणि अभिषेक घोरपडे या विद्यार्थ्याची ‘जॉन्सन कंट्रोल., पुणे’ या कंपन्यांमध्ये निवड झाली असे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत कडू यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी नेहमीच प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढ व प्लेसमेंट साठी विविध कोर्सेस व ऍक्टिव्हिटी चे आयोजन केले जाते.यामध्ये सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट,ऍप्टीट्युड टेस्ट, सॉफ्टवेअर व स्कील डेव्हलपमेंट कोर्सेस, एंटरप्रीन्यूअरशिप इंटरनॅशनल प्रोग्रॅम, करियर गायडन्स, सराव मुलाखत इत्यादी उपक्रमांचा अंतर्भाव आहे.
महाविद्यालयातील “इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल ” अभियांत्रिकी विभाग हा १९८५ साली सुरू झालेला पुणे विद्यापीठातील प्रथम कोर्स असून आतापर्यंत सुमारे सोळाशे विद्यार्थी पास आऊट होऊन जगातील सर्व नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदावर यशस्वीपणे कार्यरत आहेत. या माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या विकासामध्ये मोलाचा वाटा आहे. महाविद्यालयामध्ये आयोजित होणाऱ्या एक्सपर्ट लेक्चर, गेस्ट लेक्चर, ईनटर्नशिप, इंडस्ट्रियल व्हिजिट, मॉक इंटरव्यूव व प्लेसमेंट इत्यादी उपक्रमांमध्ये माजी विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
महाविद्यालयातील “इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल ” अभियांत्रिकी विभागाने उत्कृष्ट निकालाची परंपरा, माजी विद्यार्थ्यांचा सहयोग, अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन , लॅब डेव्हलपमेंट साठी किमाया ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड, पुणे कडून मिळालेले नॅशनल इन्स्ट्रुमेंट्स प्रायोजित सेंटर ऑफ एक्सलन्स, प्रोजेक्ट अनुदान आणि विविध नामांकित कंपन्यांसोबत केलेल्या संलग्नता करार यामुळे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल अभियांत्रिकी विभागाची मागील पाच वर्षांपासून १०० टक्के प्लेसमेंट झालेली आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट होण्यासाठी इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल अभियांत्रिकी विभागाचे प्लेसमेंट समन्वयक प्रा.वर्षा भोसले, प्रा. डॉ.प्रताप विखे, कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. आण्णासाहेब वराडे, विभाग प्रमुख प्रा.डॉ. चंद्रकांत कडू, संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. मनोज परजने, तसेच सर्व स्टाफ मेंबर्स यांनी परिश्रम घेतले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थांनी अभिनंदन केले.
प्रवरेत शिक्षणासोबत विविध उपक्रम, इंडस्ट्रियल व्हिजिट्स आणि इंटर्नशिप याद्वारे परिपुर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न होत असतो, यामुळे हे यश आम्हा मुलांसाठी महत्वपुर्ण आहे.वरील सर्व उपक्रम उपलब्ध करून दिल्याने हे यश मिळाले आहे.
(निरंजना कडू, विद्यार्थिनी, पाथरे बु.)