नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):- नेवासा तालुक्यातील गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र टोका येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचे महंत ब्रम्हलिन 1008 श्री बालब्रम्हचारी महाराज यांच्या द्वितीय पुण्यतिथी सोहळा व सिद्धेश्वर देवस्थान च्या मठाधिपती म्हणून बालयोगी परमहंस श्री महेश्वरानंद महाराज यांचा विराजमान सोहळा विधी बुधवारी सकाळी 10 वाजता पार पडला श्री बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराज यांचा मठाधिश विराजमान सोहळा विधी (चादर विधी)देशभरातून आलेल्या साधू संत यांच्या व हजारो भाविकांच्या उपस्थित बुधवार दि 20 रोजी पार पडला.
श्री श्री श्री १००८ परमहंस कृष्णानंद कालीदासबाबाजी हरियाणा,शंकराचार्य अभिनव विद्या नृसिंह भारतीजी महाराज कर्नाटक,रामानंदाचार्य राम राजेश्वराचार्य माऊली सरकार विदर्भ,सुर्याचार्य कृष्णदेवनंदगिरीजी महाराज द्वारकापीठ, कालीपुत्र श्री कालीचरणजी महाराज,महंत सुनीलगिरीजी महाराज,महंत रमेशानंदगिरीजी महाराज उपस्थित होते.
सकाळी ९ वाजता संत महतांच्या उपस्थित शोभा मिरवणुक संपन्न झाली यात हजारो भाविक सहभागी झाले होते असून त्यानंतर उपस्थित संत महंतांनी समाधी मंदिर दर्शन घेतले
श्रीराम साधना आश्रमाचे महंत श्री सुनिलगिरीजी महाराज, श्री शनीधाम आश्रमाचे महंत श्री श्री 1008 महामंडलेश्वर योगेशानंदगिरीजी महाराज,,महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज हंडीनिमगांव,जम्मू काश्मीर चे भाजप नेते नंदकिशोर शर्मा ,पंचगंगा सिडसचे प्रभाकर शिंदे,बाळासाहेब ससे,मुळाचे संचालक बाळासाहेब पाटील,जळके बु सरपंच कैलास झगरे,राहुल राजळे,राहूल लकारे,वसंतराव डावखर,संदीप सुडके, दिलीप शेलार,महेश मते,माधवराव शिंदे ,संतोष गंगुले,महेश भागवत,ज्ञानेश्वर आहेर,बाळकृष्ण भागवत ,विकास खंडागळे, गोरख नरोडे,अशोक घाडगे आदींसह भाविक भक्त मोठ्या उपस्थित होते.
बालब्रम्हचारी महाराज यांच्या द्वितीय पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने कराड येथील ह.भ.प. बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे किर्तन झाले कीर्तनानंतर नेवासा चे आमदार शंकरराव गडाख यांच्या वतीने उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.