लोणी दि.२२( जनता आवाज वृत्तसेवा ):-विविध आजाराने पीडित रुग्णांच्या सेवेसाठी पायरेन्सच्या डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चंद्रापूर (लोणी) येथे मोफत आयुर्वेद सर्व रोग निदान व चिकित्सा शिबिराचे आयोजन शुक्रवार दि.२२ डिसेंबर २०२३ सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहीती संस्थेचे सचिव डाॅ.निलेश बनकर यांनी दिली,
संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रियाताई ढोकणे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनखाली संस्थेच्या वतीने मागील काही दिवसापासून मोफत आरोग्य विषयक शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पायरेन्सच्या डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चंद्रापूर (लोणी) यांच्यावतीने मोफत आयुर्वेद सर्व रोग निदान व चिकित्सा शिबिर मोफत औषधे तसेच एक दिवशीय पंचकर्म आयुर्वेद सर्व रोग निदान व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी मोफत निदान करून सल्ला व मार्गदर्शन करण्यात करण्यात येऊन मोफत औषधी चे वाटप करण्यात येणार आहे याचा लाभ परिसरातील रुग्णांनी घ्यावा असे आवाहन पायरेन्सचे सचिव व संचालक डॉ निलेश बनकर यांनी केले आहे.