संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यातील समनापुर शिवारा तील कोल्हेवाडी फाट्याच्यासमोर असणा ऱ्या मोकळ्या जागेत समनापुरच्या एका तरुणाचा धारदार चाकूने गळा कापूनखून केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असल्याची शनिवारी पहाटे उघडकिस आली आहे. अवघ्या एकाच तासात संगमनेर शहर पोलिसांनी दोन्हीही मारेकऱ्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत.
अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत (वय २२) रा समनापुर ता संगमनेर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. संगम नेर शहर पोलिसांची माहिती अशी की संगमनेर – लोणी रस्त्यावरील समनापुर शिवारातील हॉटेल नेचर जवळील एका मोकळ्या मैदानात सावंत याचा गळा चिरून खून केलेल्या अवस्थेत मृतदेह काही जणांनी पाहिला .
याघटनेची माहिती आता समनापुरचे का पो पा गणेश शेरमाळे यांना देण्यात आली शेरमाळे यांनी यांनी संगमनेर शहर पोलिसांना या घटनेची दिली . माहिती मिळताच पो नि भगवान मथुरे हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.घटना स्थळावरती बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दी बाजूला हटवून पंचनामा केला अतुल सावंत या तरुणाच्या गळ्यावर धारदार चाकूने खोलवर जखमा केल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले
घटनास्थळी चाकू दारूच्या बाटल्या, चप्पल काडीपेटी पडलेली पोलिसांना दिसून आली होती. घटनास्थळापासून या अतुल सावंत या तरुणाचा मृतदेह २० ते २५फूट अंतरावर पडला होता. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. घटनास्थळी सापडलेले सर्व साहित्य जप्त केले संगम नेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे हे घटनास्थळी हजर झाले रुग्णवाहिकेस पाचारण करून सावंत या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदना साठी संगमनेर नगरपालिकेच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आला. या बाबत संगमनेर शहर पोलीस सात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .
संगमनेर तालुक्यातील समनापुर येथील अतुल सावंत हा तरुण गोसावी समाजाचा आहे. त्याचा खून झाल्यामुळे गोसावी समाज बांधव घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झाले होते. सावंत या तरुणाचा खून नेमका कोणी व कशासाठी केला असेल याचा पोलिसांनी त्वरित तपास लावूनखून करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी. अशी मागणी गोसावी समाजाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विशाल चव्हाण यांनी केली आहे .



