पाथर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- वयोवृद्ध व्यक्तीला चोरट्याने डोक्यात अज्ञात हत्याराने वार करून ठार केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शिवारात घडले आहे. या घटनेत मच्छिंद्र तुकाराम ससाणे वय ८५ असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.या दुर्दैवी घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली असून परिसरात भीतीच वातावरण पसरले आहे. शुक्रवारी रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी तिसगाव येथील वृद्धेश्वर हायस्कूल ते शिरापूर रोड लगत भडके वस्तीवर राहणाऱ्या मच्छिंद्र ससाने यांच्या घरावर चोरी करण्याच्य उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी ससाणे यांच्या तेथून चार ते पाच कोंबड्या चोरी केल्या असून लघु शंकेला उठलेल्या मच्छिंद्र ससाणे यांना डोक्यात गंभीर मार करून त्यांना ठार केले.
घराबाहेर आलले ससाने यांना चोरट्याने प्रथम बाहेर मारहाण केली. नंतर घरातही गंभीर मारहाण केली. यामध्ये ससाणे यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अहमदनगर या ठिकाणी हलवण्यात आले.मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मच्छिंद्र सासणे व त्यांची पत्नी एका ठिकाणी राहत असून बाजूला त्यांचे दोन मुले राहतात.चोरीच्या पूर्वी चोरट्यांनी आजू बाजूच्या वस्तीवरील घरांच्या दरवाजे बाहेरून बंद करून ठेवले होते. त्यामुळे घटनेच्या ठिकाणी लोकांची लवकर मदत मिळू शकली नाही. घटनेच्या वेळी कुत्रे,जनावरे पूर्णपणे शांत होते या पाळीव प्राण्यांना सुद्धा एका प्रकारे मोहित केले गेले होते.
दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस अधिक्षक राकेश ओला,अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे,पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव,निवृत्ती आगरकर हे उपस्थित होते.
तपासाच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक ओला यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तपासाबाबत सूचना दिल्या असून या घटनेचा लवकरच तपास लावला जाईल असे यावेळी राकेश ओला म्हणाले.पोलिसांनी लगेच तपासाची चक्र फिरवून काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी हस्तगत केले आहे.