श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर शहर व तालुक्यात गणेशोत्सव उत्साहात आणि धुमधडाक्यात सुरू असून आज गणेशोत्सवानिमित्त श्रीरामपूर शहरात महाराष्ट्रात गाजत असलेली प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील हिचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
आज, गुरूवार दि. १२ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर शहरात राजाभाऊ कापसे मित्रमंडळ आणि जय श्रीमहाकाल मित्रमंडळ यांच्यावतीने सायं. ६ वा. गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम शहरातील छत्रपती शिवाजी रोडवर असणाऱ्या गिरमे चौक येथे आयोजित करण्यात आला आहे.
यंदाच्या गणेशोत्सवामध्ये राजाभाऊ कापसे मित्र मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आतापर्यंत लावण्य खणीसह दोन कार्यक्रम झाले असून आज दि.१२ सप्टेंबरला गौतमी पाटीलचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर उद्या १३ सप्टेंबरला नटखट सुंदरा, दि. १४ सप्टेंबरला चंद्रा आणि दि. १५ सप्टेंबरला हि चंद्राची चांदी अशा बहारदार कार्यक्रमांची रेलचेल राजाभाऊ कापसे मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवात राहणार आहे.
या होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राजाभाऊ कापसे, विकी कापसे यांच्यासह राजाभाऊ कापसे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.



