10.9 C
New York
Wednesday, November 20, 2024

Buy now

spot_img
spot_img

जिल्हा ऑलंपिक संघटनेशी संलग्न असलेल्या विविध क्रीडा संघटनांचा आ. संग्राम जगताप यांना जाहीर पाठिंबा

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- शहरातील क्रीडा संघटना, सर्व खेळाडू यांच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून केलेली मदत, खेळाडूंचा केलेला सन्मान, खेडाळूंसाठी पायाभूत सुविधांची केलेली उभारणी यामुळे आ. संग्राम जगताप यांच्या कामावर क्रीडा प्रेमी समाधानी आहेत. त्यामुळे होवू घातलेल्या निवडणुकीसाठी अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा ऑलंपिक संघटनेशी संलग्न असलेल्या विविध क्रीडा संघटना, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक एकविध क्रीडा संघटना व ज्येष्ठ खेळाडू यांच्यावतीने आ. संग्राम जगताप यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षापासून आमदार संगाम जगताप प्रतिनिधीत्व करत आहेत. या दहा वर्षाच्या काळात आ. जगताप यांनी खेळाडूंसाठी लागणाऱ्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा क्रीडा संकुलातील विविध खेळाची मैदाने तसेच सोयी सुविधांसाठी 51 कोटींच्या निधीला राज्य सरकारची मंजूरी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नामुळे मिळाली आहे. त्यातील पहिला टप्प्यातील साडेपंधरा कोटींच्या खर्चाला प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. आ. जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा क्रीडा संकुल कात टाकणार आहे. क्रीडा प्रेमींसाठी केलेल्या कामामुळे प्रभावित होवून अहमदनगर जिल्हा ऑलंपिक संघटनेशी संलग्न असलेल्या सर्व क्रीडा संघटनांनी आमदार संग्राम जगताप यांना बिनशर्त पाठिंबा दिली आहे.

पाठिंबा दिलेल्या संघटनांमध्ये अहमदनगर हॉलीबॉल असोसिएशन, अहमदनगर ॲथलेटिक्स असोसिएशन, अहमदनगर सायकलिंग असोसिएशन, अहमदनगर बॉल टेनिस असोसिएशन, अहमदनगर जिल्हा खो खो असोसिएशन, अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन, अहमदनगर जिल्हा कॅरम असोसिएशन, अहमदनगर मल्लखांब असोसिएशन, अहमदनगर रोल बॉल असोसिएशन, टिम टॉपर्स स्केटींग अकॅडमी, आईस स्टॉक असोसिएशन, सावेडी बास्केटबॉल असोसिएशन, युथ स्पोटस ॲथलेटीक्स अकॅडमी, अहमदनगर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेकट अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटना, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, अहमदनगर जिल्हा पावर लिफ्टींग असोसिएशन, अहमदनगर जिल्हा वेट लिफ्टींग असोसिएशन, अहमदनगर जिल्हा बॉडी बिल्डींग असोसिएशन, अहमदनगर जिल्हा एरोबिक्स असोसिएशन, अहमदनगर जिल्हा जलतरण संघटना, अहमदनगर जिल्हा ट्रायथलॉन संघटना, कपिल पवार- कै. बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धा समिती, यंग मेन्स ज्युदो ॲण्ड मार्शल आर्ट असोसिएशन, अहमदनगर जिल्हा कुराश असोसिएशन, अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशन, अहमदनगर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, अहमदनगर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन, अहमदनगर जिल्हा हॉकी असोसिएशन, अहमदनगर जिल्हा लंगडी असोसिएशन, टॉपर्स क्रीकेट अकॅडमी, ट्रेक रेसर्स स्पोर्ट फाऊंडेशन, अहमदनगर जिल्हा जिनमॅटिक असोसिएशन, अहमदनगर जिल्हा स्काऊट असोसिशन, अहमदनगर जिल्हा कायकिंग असोसिएशन, अहमदनगर जिल्हा कानोईंग असोसिएशन, अहमदनगर जिल्हा किक बॉल असोसिएशन, अहमदनगर जिल्हा बॉल टेनिस असोसिएशन, अहमदनगर जिल्हा सायकलिंग असोसिएशन, साईनाथ क्रीडा बहुउद्देशीय मंडळ, अहमदनगर जिल्हा बेसबॉल असोसिएशन, अहमदनगर जिल्हा रोईंग असोसिएशन, अहमदनगर जिल्हा रोलिंग असोसिएशन, अहमदनगर जिल्हा मिनीगोल्फ असोसिएशन, अहमदनगर जिल्हा कॅरम असोसिएशन, विरेंद्र क्रीडा मंडळ, सहयोग क्रीडा मंडळ, अहमदनगर जिल्हा मॉडर्न पेंटस लॉन असोसिएशन, अहमदनगर बॅडमिंटन असोसिएशन, अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघ, अहमदनगर जिल्हा रस्सीखेस संघटना, अहमदनगर सिटी रायफल ॲण्ड पिस्तोल स्पोर्टस असोसिएशन, अहमदनगर कॉर्फ बॉल असोसिएशन, अहमदनगर कायकिंग ॲड कनोइंग असोसएशन, अहमदनगर चेस असोसिएशन, अहमदनगर आईस स्टॉक असोसिएशन, अहमदनगर पॅरालिंपीक असोसिएशन या आदी संघटनांचा समावेश आहे.

यावेळी डेव्हिड मकासरे, शैलेश गवळी, अविनाश काळे, निर्मल थोरात सर, रावसाहेब बाबर सर, संजय धोपावकर सर, दरेकर सर, रॉनय फर्णाडिस सर, प्रदिप जाधव, खालिद सय्यद, राजेंद्र पाटोळे, प्रमोद आठवाल, सचिन गायकवाड, प्रदिप पाटोळे, राहुल जामगावकर, नंदेश शिंदे, शंतनू पांडव, प्रशांत गंधे, विनायक भुतकर, मनोज गायकवाड, सुरेखा खैरनार, कपिल पवार, प्रसाद पाटोळे, मल्हार कुलकर्णी, महेश आनंदकर, प्रशांत पाटोळे, मुंकुंद काशिद, सचिन भापकर, सनी साळवे, अनिल राठोड, अमित चव्हाण, अनिकेत कोळगे, कृष्णा लांडे, संतोष गाडे, सचिन सप्रे, संतोष घोरपडे, मोहित भगत, प्रशांत निमसे, मनोज ढोले, प्रविण धुर्वे, पांडुरंग उर्फ बंटी गुंजाळ, विजय शिंगारे, सचिन जावळे आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!