12 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

जगताप परिवार शहर विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहील- जि. प. सदस्य सचिन जगताप निर्मलनगरला वंजारी समाजाचा मेळावा संपन्न समस्त वंजारी समाज बांधवांचा आ.संग्राम जगताप यांना पाठिंबा

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-  सावेडी उपनगरात निर्मल नगर येथे वंजारी समाजाचा मेळावा शनिवार  मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वंजारी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री. संत भगवान बाबा मंदिरात मेळाव्याचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्याला समस्त वंजारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. यामध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, शिक्षक वृंद, वधू वर मंडळाचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, महिला भगिनी, तरुण मोठ्या संख्येने मेळाव्याला हजर होते. याप्रसंगी हभप राम घुले महाराज ह भ प रवींद्र आव्हाड महाराज यांनी समस्त बांधवांना श्री.संत भगवान बाबा श्री.संत वामन भाऊ यांच्या जीवन चरित्राचा प्रवास कथन केला. समाज संघटित करण्यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी किती त्याग केला याबद्दल माहिती दिली.

श्री संत भगवान बाबा यांनी शिक्षणाला महत्त्व दिले. एकर विका पण शिका हा संदेश देत समाजाला शिक्षणाचे महत्त्व किती असते ते पटवून दिले. त्यामुळेच आज आपल्या समाजाची माणसं मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. असे हभप रविंद्र महाराज यांनी स्पष्ट केले. स्व. मुंडे यांच्या दानशूर व्यक्तिमत्त्वामुळे ते समाजात लोकप्रिय होते समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी आपले सारे जीवन समर्पित केले होते म्हणूनच आज ते प्रत्येकाच्या मनात देवाप्रमाणे पूजले जातात. असे आव्हाड महाराज यांनी सांगितले.

या मेळावा मध्ये नगर शहराचे कार्यसम्राट आ. संग्राम जगताप यांच्या विकास कामांसाठी त्यांचे असलेले योगदान पाहून सर्व समाजातील जनतेला बरोबर घेत शहर विकासासाठी असलेले व्हिजन, त्यांची दूरदृष्टी, इच्छाशक्ती प्रबळ असल्याने भविष्यात पुन्हा नगर शहरात विकासासाठी त्यांना पुन्हा आमदार होणे हे आमचे ध्येय आहे. त्यामुळे समस्त वंजारी समाज बांधवांनी भगवान बाबा मंदिरात बाबांच्या साक्षीने आ.संग्राम जगताप यांना जाहीर पाठिंबा देण्याचे जाहीर केले या निर्णयाचे उपस्थित त्यांचे बंधू जि.प. सदस्य सचिन जगताप यांनी स्वागत केले व जगताप परिवार शहर विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या निर्णयाचे सर्वांनी हात उंचावून स्वागत केले.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!