श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ): – आपण सर्वांनी त्रास घेऊन जि संघटना वाढवली. त्या संघटनेला खऱ्या अर्थाने आता काम करण्याची वेळ असुन जे झाल ते सोडून देऊ शहरात दहशतीचे वातावरण आहे. स्व. जयंतराव ससाणे यांच्या काळात असलेला पुर्वीसारखा धाक आता उरला नाही. तो धाक निर्माण करण्यासाठी करण ससाणे यांना पाठबळ देण्याची गरज आहे. त्यासाठी हेमंत ओगले यांना सहकार्य करण्यासाठी आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करत असुन सर्व संघटनेने मिळून हा निर्णय घेतलेला असल्याने उपस्थीत सर्वांच्या सल्ल्याने आपण हा निर्णय घेतला असे मत गांगड परीवार आणि सहकारी यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमा प्रसंगी मांडले.
शहरातील गांगड परिवाराच्या निवासस्थानी पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यास जिल्हा बँकेचे संचालक तथा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी नगरसेवक आशिष धनवटे आदी प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी अशोक गांगड, नाना गांगड, संजय गांगड, बाबा गांगड, राजू गांगड, आणि सोमनाथ गांगड या गांगड परिवारासह संघटनेचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दरम्यान बोलताना संजय गांगड पुढे म्हणाले की,स्व. जयंतराव ससाणे आणि स्व. बाळासाहेब गांगड यांची चांगली मैत्री होती. त्यावेळी मा. नगराध्यक्ष संजय फंड हे देखील त्यांच्या सोबत होते. आता हि मैत्री जागी करण्याचे काम खऱ्या अर्थाने आपले आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत ओगले यावेळी म्हणाले की, स्व. जयंतराव ससाणे यांनी स्व. बाळासाहेब गांगड आणि मा. नगराध्यक्ष संजय फंड यांना सोबत घेऊन बांधलेली संघटना आज मजबूत स्थितीत असून मी ना पक्ष सोडला न संघटना, काँग्रेस पक्षाच तिकीट मिळणं वाटत तेवढ सोप नव्हतं, संघटनेची ताकद मिळाली संघटनेचा रेटा मोठा असल्याने मला तिकीट मिळाले मागच्या दोन लोकांना अनुभव येत असेल डोक्यात हवा गेल्याने काय प्रकार होतो.
जिल्हा बँकेचे संचालक तथा नगरपालीकेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे आपल्या मनोगतात म्हणाले की, आपले महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत ओगले यांचा पायगुण चांगला म्हणावा लागेल मतदार संघातील स्व. जयंतराव ससाणे यांची संघटना पुन्हा जोडली गेली आहे. यावेळी गांगड परिवार आणि सहकार्यांचे त्यांनी आभार मानले. हे दिवस बघायला स्व. बाळासाहेब गांगड आणि स्व. जयंतराव ससाणे पाहीजे होते. स्व. बाळासाहेब गांगड संघटनेची ढाल होते. आता आपल्याला हेमंत ओगले यांना विजयी करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायची आहे. सोमनाथ गांगड यांना सोबत घेऊन मोठ काम करू प्रत्येकात विश्वासाच नात निर्माण करू
मा. नगराध्यक्ष संजय फंड यावेळी म्हणाले की, सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारा हा गांगड परिवार असुन स्व. बाळासाहेबांच आमच्या सोबत बंधुप्रेमाच नात होत. आजचा हा आनंदाचा क्षण असुन गांगड परिवाराच्या या निर्णयाचं त्यांनी स्वागत केल.
यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे यांनी फिर वही दिन लाये म्हणतात टाळ्याच्या कडकडाटात उपस्थीत सर्वांनी या निर्णयाच स्वागत केल.
दरम्यान किरण नवले, खंडेराव सदाफळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मा.नगरसेवक आशीष धनवटे यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याबद्दल गांगड परिवाराचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी साईनाथ गवारे ,अण्णा जाधव, मधुकर देशमुख, रमेश नवले, राहुल कोठारी, ऍड. युवराज फंड, संजय दुधेडीया, दत्ता धालपे, दत्ता कल्हापूरे, ज्ञानेश्वर विखनकर, योगेश गंगवाल, राजेंद्र जाधव, बाळासाहेब सलालकर, अशोक शिंदे, संजय सोमवंशी, सुनील नांगल, विनित बापट, संजय कुलथे, श्री. खरे, अशोक पवार, नंदू काळे, राजेंद्र जाधव, संदीप विसपुते, प्रमोद धनवटे, पुंडलिक जऱ्हाड, राजू शिंदे, निखिल खैरे, ऋषी चव्हाण, विशाल गायधने, श्रीपाद बोऱ्हाडे, हरीष धोत्रे, नीलेश घोरपडे, आकाश जाधव, सुनिल कल्याणकर, श्री. घुगे, श्री. देशमुख, अजित शिरसाठ, महेंद्र सातदिवे, अविनाश मोरे, आशिष मोरे, युवराज घोरपडे, जयेश खर्डे, ओम धनवटे, ओम विसपुते, सन्नी दौंडकर, दीपक गायकवाड, हेमंत मोहिते, भाऊसाहेब शिरसाठ, अजिंक्य मेहेत्रे, सिद्धार्थ सोनवणे, तुषार पारखे, सनी सानप, शिवाजी मोरे, सुनिल नांगळ, ऋतीक चव्हाण, शुभम जगताप, अमोल परदेशी, रोहित शिंदे दादा गायधने, श्रीपाद बोराडे, अण्णा जाधव, राहुल कोठारी, बाळासाहेब सराळकर, दीपक गायकवाड, निलेश घोरपडे, ज्ञानेश्वर गिरमे, संदीप विसपुते, तुषार पारखे, प्रमोद धनवटे, श्री. सावंत, सुभाष पोटे, ऋषी चव्हाण, धनवटे ओंकार, शुभम जगताप, राजू गायकवाड, पुंडलिक जराड, रमेश चोथे, गब्बू इंगळे, सुनील कल्याणकर, कृष्णा नवगिरे, सचिन तोडकर, प्रसाद अंबिलवादे ,जयेश खर्डे, राजू शिंदे, हरून शेख, हेमंत मोहिते, आशिष मोरे, आकाश जाधव, जाबीर शेख, रोहित कांबळे, भैय्या धोत्रे आदिंसह अनेकजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.