कोल्हार ( वार्ताहर ) :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल सोमवार दि. ३ एप्रिल २०२३ रोजी गव्हाची १०६ क्विंटल आवक झाली. गहू कमीत कमी १९०० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त २२४० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला. गहू सरासरी २२०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला.
तसेच कोल्हार उपबजारात सोयाबीनची २ क्विंटल आवक झाली. सोयाबीन सरासरी ५१५० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आली असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.





