भाळवणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-मला भाषण करता येत नाही, मी विधिमंडळात काय बोलणार अशी टीका विरोधक करीत आहेत. मी विरोधकांना निक्षूण सांगते की, मी खा. नीलेश लंके यांच्या पावलावर पाऊल ठेउन काम करणार असून मी लंके साहेबांची वाघीण आहे हे लक्षात ठेवा असा इशारा महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांनी दिला. दरम्यान या सभेत जिल्हा परिषदेच्या कृषि व पशुसंवर्धन समितीचे मा.सभापती बाबासाहेब तांबे, पंचायत समितीचे मा. सदस्य विकास रोहोकले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके ढवळपुरी गटातील प्रचाराचा शुभारंभ भाळवणीचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. त्यावेळी लंके यांनी विरोधकांच्या टिकेला उत्तर देत इशारा दिला.
राणी लंके म्हणाल्या, आजची गर्दी पाहता ही प्रचारसभा नाही तर विजयी सभा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. खासदार नीलेश लंके हे आमदार असताना त्यांनी मतदारसंघासाठी मोठा निधी मंजुर केला आहे. भविष्यातही विकास कामांची ही परंपरा सुरूच राहणार असल्याचा विश्वास लंके यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना खा. नीलेश लंके म्हणाले, ज्यांनी प्रवेश केला, पाठींबा दिला. त्यांना सर्वांना प्रतिष्ठा, सन्मान दिला जाईल. पुर्वीच्या सहकाऱ्यांनाही त्यांचा सन्मान मिळेल. जसे कळसाला महत्व तसेच पायाला महत्व आहे. तुम्ही काही काळजी करू नका. जवळयात पाहा एकच वेळी दोघांना बाजार समितीची उमेदवारी दिली व विजयी देखील केले. महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. सर्वांना योग्य न्याय मिळेल. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझे पक्षात चांगले वजन आहे.
राजकारणात कोणी कोणाचे मित्र अथवा शत्रू नसतात. महाविकास आघाडीमध्ये विविध विचारसरणीचे पक्ष एकत्र आले आहेत. तुम्ही एकत्र आले तर बिघडले कुठे ? गोरेगांवमधील दोन गट पूर्वी एकत्रच होते. सर्वांनी गुण्यागोंविंदाने रहावे. समुद्रासारखे मन असणारा मी माणूस आहे. माझ्या खांद्यावर मान टाकल्यावर ती सुरक्षित ठेवण्याची माझी जबाबदारी आहे. मनमोकळे रहा, मोठे मताधिक्य द्या. मी साधा माणूस आहे कामाचा आहे एकदिलाने काम करू. विश्वास संपादन करणे महत्वाचे असते असे सांगत नव्याने प्रवेश केलेल्यांचे स्वागत करतानाच पूर्वाश्रमीच्या कार्यकर्त्यांनाही खा. लंके यांनी दिलासा दिला.
यावेळी प्रा.शशिकांत गाडे, बाबासाहेब तरटे, माधवराव लामखडे, जयंत वाघ, अशोक घुले, बाबासाहेब तांबे, विकास रोहोकले, सुरेश धुरपते, सुदाम पवार, बाळासाहेब हराळ, गंगाराम रोहोकले, कारभारी पोटघन, ॲड. राहुल झावरे, संपत म्हस्के, प्रकाश राठोड, डॉ. नितीन रांधवन, सुमन तांबे, लिलाबाई रोहोकले, बबलू रोहोकले, राजेश भनगडे, गणेश हाके, अप्पासाहेब शिंदे, भास्कर शिंदे, वंदना गंधाक्ते, मोहन रोकडे, राजेंद्र चौधरी, दीपक गुंजाळ, सुवर्णा धाडगे, प्रियंका खिलारी, सुनीता झावरे, ज्योती रोडे आदी उपस्थित होते.
खा. लंकेंप्रमाणेच राणी लंकेही भाषण करतील
उपस्थितांचा उत्साह पाहीला तर आजच गुलाल उधळण्यास हरकत नाही. सन २००९ रोजी नीलेश लंके हे तालुकाप्रमुख झाले त्यावेळी त्यांना भाषण करता येत नव्हते आज ते खासदार झाले असून उत्तम भाषण करतात. त्यांच्याप्रमाणेच राणीताई लंके या अस्सलिखित भाषण करतील. कबड्डी स्पर्धांवेळी नीलेश लंके यांनी क्रिडा मंत्र्यांना पत्र दिल्यानंतर १०० कोटींची मागणी केली. त्याचे विश्लेषनही त्यांनी चांगले केले. त्यानंतर मंत्र्याने शंभर कोटी रूपयांपेक्षाही अधिक निधी देण्याचा शब्द दिला. यावरून त्यांची प्रशासनावरील पकड लक्षात येते.
प्रा. शशिकांत गाडे (जिल्हाप्रमुख, शिवसेना )
अहिल्यादेवींप्रमाणे राणी लंके आदर्श काम करतील
पारनेर तालुक्यात ढवळपुरीच्या गावडेवाडीतील आमच्या पणजी होत्या. त्या इंदोरच्या महाराणी झाल्या. पहिली चारचाकी चालविणाऱया त्या पहिली महिला होत्या. या तालुक्याला मोठा वारसा आहे. अहिल्यादेवींसारखे काम करणाऱ्या राणीताईंना निवडूण द्यायचे आहे. अहिल्यादेवींप्रमाणे राणी लंके या आदर्श काम करतील.
भुषणराजे होळकर( अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज)
तांबे, रोहोकलेंच्या साथीने ढवळपुरी गट भक्कम
बाबासाहेब तांबे, विकास रोहोकले यांनी खा. नीलेश लंके यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याने राणी लंके यांच्यासाठी ढवळपुरी गट भक्कम झाला आहे. या गटातून मोठे मताधिक्क्य मिळवून देण्यासाठी परीश्रम करण्याची घोषणा तांबे व रोहोकले यांनी केली.