9.5 C
New York
Tuesday, November 19, 2024

Buy now

spot_img
spot_img

या दशहतीच्‍या भाषेला शिर्डी मतदारसंघातील जनता चोख उत्‍तर देईल- महसूलमंत्री.राधाकृष्‍ण विखे पाटील कोल्‍हार येथे महायुतीच्‍या प्रचारार्थ सभा

कोल्‍हार( जनता आवाज वृत्तसेवा ):-आम्‍ही विकासाचा विचार करुन पुढे जातो, विरोधक काय म्‍हणतात याकडे लक्ष द्यायलाही आम्‍हाला वेळ नाही. निवडणूकीच्‍या सर्व प्रचारात महाविकास आघाडीचे नेते त्‍यांचे एकही काम सांगु शकले नाही. महायुतीच्‍या निर्णयांचा लेखाजोखा आम्‍ही जनतेपुढे मांडला आहे. ज्‍यांच्‍याकडे सांगायलाच काही नाही ते फक्‍त निंदा नालस्‍ती आणि दशहतीची भाषा बोलू शकतात. परंतू या दशहतीच्‍या भाषेला शिर्डी मतदार संघातील जनता चोख उत्‍तर देईल महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

कोल्‍हार येथे महायुतीच्‍या प्रचारार्थ आयोजित केलेल्‍या जाहीर सभेत मंत्री विखे पाटील यांनी शिर्डी मतदार संघात आणि कोल्‍हार गावामध्‍ये उभ्‍या केलेल्‍या विकास प्रकल्‍पांचा आढावा सांगून, ही सुरु असलेली कामे म्‍हणजेच आमचा विकासाचा दशहतवाद आहे. पण हा विकासाचा दशहतवाद पाहावत नसलेल्‍या महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांच्‍या डोळ्यात मात्र वेगळाच दशहतवाद आहे. चुकीच्‍या पध्‍दतीने लोकांमध्‍ये फक्‍त संभ्रम निर्माण करण्‍याचे काम लोकांमध्‍ये निर्माण केल. परंतू येथील जनता विकासाच्‍या मागे उभे आहे, तुमच्‍या दशहतीच्‍या भाषेला येथील जनता थारा देणार नाही अशा स्‍पष्‍ट शब्‍दात त्‍यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

अतिशय विश्‍वासाने या भागातील जनतेने राज्‍यात काम करण्‍याची संधी दिली. या मतदार संघाचे नाव मोठे होईल असेच काम करीत गेला. कुठेही या जनतेला खाली पाहावे लागेल असे कृत्‍य माझ्याकडून घडले नाही. कारण माझ्यावर पद्मश्रींच्‍या विचारांचा संस्‍कार आहे, खासदार साहेबांची शिकवणूक आहे आणि पाठबळ देणा-या जनतेकडून काम करण्‍यासाठी मिळणारी प्रेरणा माझा आत्‍मविश्‍वास वाढवितो. त्‍यामुळेच विकास प्रक्रीया साध्‍य करण्‍यासाठी उर्जा मिळत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

विधानसभेच्‍या निवडणूकीच्‍या निमित्‍ताने विकास कामांवर चर्चा अपेक्षित होती. मात्र संगमनेरच्‍या नेत्‍यांच्‍या कुबड्या घेवून काही लोकांनी दशहतीचा मुद्दा उपस्थित केला. पण अडीच वर्षात काय केले हे महाविकास आघाडीचे नेते सांगू शकले नाही. महायुती सरकारने मात्र शेतकरी, महिला आणि युवक यांच्‍यासाठी योजना सुरु करुन सर्वांनाच आधार दिला. आज यांना लाडक्‍या बहीणींची आठवण झाली. मागचे अडीच वर्ष मात्र या बहीणी त्‍यांना दिसल्‍या नाहीत. योजना बंद पडावी म्‍हणून हेच कोर्टात गेले. आता मात्र काळजी करु नका, लाडक्‍या बहीणींचे अनुदान आता २१०० रुपये करणार असून, शेतक-यांना कर्जमाफीचा निर्णय सुध्‍दा सरकार आल्‍यानंतर घेतला जाणार असल्‍याची माहीती त्‍यांनी आपल्‍या भाषणात दिली.

कोल्‍हार गावाच्या विकास प्रक्रीयेला नेहमीच आपले सहकार्य राहीले. ६० कोटी रुपयांची पाणी योजना आज मंजुर झाली आहे. ६ कोटी रुपयांच्‍या रस्‍त्‍यांचे काम मार्गी लागले आहे. जिल्‍हा परिषद शाळेचा विकास बीओटी तत्‍वावर आपण केल्‍यामुळे या गावाचा चेहरा मोहरा आता बदलला आहे. ही सर्व कामे करताना दशहत होती का असा सवाल उपस्थित करुन, कोणत्‍या ना कोणत्‍या मार्गातून या भागातील अनेकांना आपण मदत केली. काहीजन अंधारात पाय धरीत होते.

भगवती मातेच्‍या साक्षीनं घेतलेल्‍या शपथाही त्‍यांच्‍या खोट्या ठरल्‍या. अनेकांच्‍या कुटूंबियांना मदत केली तेव्‍हा दशहत नव्‍हती का. अनेकांच्‍या घरावर घाला आला, त्‍यांनाही वाचविले पण काळाच्‍या ओघात लोक विसरुन जातात, पण जे विसरले ते विसरले आता सामान्‍य जनता ही माझ्या पाठीशी खंबीर असल्‍यामुळेच, विरोधकांच्‍या कुठल्‍याही आरोपाला सामोरे जायला मी तयार असतो. या निवडणूकीला जाणीवपूर्वक दशहतीचा आरोप करुन, संपूर्ण मतदार संघातील जनतेलाच अपमानीत करण्‍याचा प्रयत्‍न झाला आहे. येत्‍या २० तारखेला शिर्डी मतदार संघातील सुज्ञ जनता दशहतीची भाषा करणा-यांना चोख उत्‍तर देईल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

राज्‍यातील जनतेनं महायुती सरकारला पाठबळ देण्‍याचा निर्णय केला असल्यामुळेच अनेक एजन्‍सी आणि वृत्‍तवाणीन्‍यांचे सर्व्‍हेक्षण समोर आले आहेत. यातून राज्‍यात पुन्‍हा एकदा महायुतीचे सरकार सत्‍तेवर येणार असून, १६० ते १६५ जागा महायुतीला मिळतील असा विश्‍वास मंत्री विखे पाटील यांनी आपल्‍या भाषणा दरम्‍यान व्‍यक्‍त केला. याप्रसंगी माजी आमदार आणासाहेब म्‍हस्‍के पाटील, डॉ.भास्‍करराव खर्ड, अशोक आसावा यांचीही भाषण झाली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!