कोल्हार ( वार्ताहर ) :- राहाता तालुक्यातील भगवतीपूर काळा मळा येथील शेतकरी कुटुंबातील चिरंजीव मनोज भानुदास खर्डे यांची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बीएसएफ असिस्टंट कमांडंट पदी निवड झाली.
मनोज खर्डे यांची 2019 मध्ये झालेल्या यूपीसी मार्फत घेण्यात आलेल्या सीएपीएफ परीक्षेमध्ये ऑल इंडिया 142 रँक मध्ये त्यांची निवड झाली. त्यांची बीएसएफच्या टेकनपुर येथे प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यांची (मध्य प्रदेश ) असिस्टंट कमांडंट पदी निवड झाली असून सध्या त्यांची पोस्टिंग पंजाब येथे झाली आहे. मनोज याची माध्यमिक शिक्षण प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल पीपीएस प्रवरानगर, पीव्हीपी जूनियर कॉलेज लोणी तसेच बी टेक सिविल मुंबई येथील व्ही जे टी आय कॉलेजमधून पूर्ण केले.
या निवडीबद्दल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज खर्डे यांचा सत्कार केला. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्राचार्य भानुदास जयराम खर्डे यांचे ते चिरंजीव आहेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याची माजी चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे पाटील, संचालक स्वप्निल निबे, श्रीकांत खर्डे,धनंजय दळे, साईनाथ खर्डे बंधू अनिल खर्डे आई शैला खर्डे व वहिनी स्मिता खर्डे यांनी अभिनंदन केले.





