श्रीगोंदा(प्रतिनिधी) :-मुलांचे वार्षीक स्नेह संमेलनात चिमुकल्या ना आपली कला सादर करण्याचे एक मोठे व्यसपीठ उपलब्ध असून त्यातूनच नाव नवीन कलाकार खेडयातून घडतात असे प्रतिपादन भाजपच्या महिला जिल्हा सरचिटणीस अनुजा गायकवाड यांनी केले.
जिल्हा परिषद शाळेतूनच नवीन कलाकार घडतात-अनुजा गायकवाड
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंभळे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन 2022_ 23 उत्साहामध्ये पार पडले त्याप्रसंगी अनुजा गायकवाड बोलत होत्या.गावातील विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली
याप्रसंगी भाजपच्या जिल्हा सरचिटणीस अनुजा गायकवाड, सरपंच छाया गायकवाड,सुनील गायकवाड, संजय सावंत,दीपक गायकवाड, यांच्या सह ग्रामपंचायत सद्स व ग्रामस्थ व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
आज युगात प्रत्येक पालकाला वाटते आपला मुलगा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकला पाहिजे, पण जिल्हा परिषदेच्या शाळेत आपली मराठी बोली भाषा व आपली संस्कृती कशी जपायची शिकवले जाते,आई वडीलांचा मान सन्मान कसा ठेवायचा हे शिकबले जाते या जिल्हा परिषद शाळेतून च त्यातूनच नवीन पिढी घडत असल्याचे गौरउदगार सरचिटणीस अनुजा गाईकवाड यांनी काढले ।




