spot_img
spot_img

पारनेरात प्रति आमदार तयार!

पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-पारनेर तालु्क्यात प्रति आमदार तयार झाले आहे. हे प्रतिआमदार आपणच सगळे कामे करतो, असे दाखवित आहे. हे प्रतिआमदार चुकीची पध्दतीने माहिती देऊन ती प्रसिध्दी करून आणत आहेत. 

आमदार महोदय एखाद्या नेत्याला भेटू आल्यानंतर काहीजण तेथे चर्चा झालेली नसताना चर्चा झाल्याचे दाखवून वृत्त प्रसिध्द करीत आहे. ही चुकीची पध्दत पारनेर तालुक्यात सुरु झालेली आहे.

हे प्रति आमदार आमदार महोदयांच्या जिल्हा परिषद गटातील आहेत. त्यांच्या चंचलपणाला थोडा लगाम घालावा अशी मागणी होत आहे. या प्रति आमदाराचा नेहमीच उगवत्या सूर्याला नमस्कार असतो.

या अगोदरही या प्रति आमदाराने आमदार नीलेश लंके यांच्या गोटात सहभागी होऊन आपली लीलया दाखविण्यास सुरवात केली होती. परंतु त्याच्यातील गुण ओळखून त्याला कधीच बाहेर काढले होते.

हे प्रति आमदार आता विद्यमान आमदारांच्या गटात दाखल झालेले असून प्रसिध्दीची जबाबदारी संभाळत आहेत. प्रत्यक्षात हे प्रति आमदारांचे उद्योग आठ दिवसात वाढलेले दिसून येत आहे. चुकीची माहिती देऊन ते जनतेची दिशाभूल करीत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!