कोल्हार ( वार्ताहर ) :- कोल्हार भगवतीपूर येथील बांगरे वस्तीवरील मारुती मंदिरासमोर हनुमान जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. ३१ मार्चपासून प्रारंभ झालेल्या या सप्ताहाची सांगता शुक्रवार दि. ७ एप्रिल रोजी होणार असल्याची माहीती सोहळ्याचे संयोजक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख अनिल बांगरे यांनी दिली.
यंदा सप्ताहाचे १४ वे वर्ष आहे. महंत रामानंदगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व नानामहाराज गागरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह होत आहे. नामदेव महाराज क्षीरसागर हे व्यासपीठचालक आहेत. सप्ताहकाळात पहाटे ४ ते ५ काकडा भजन, सकाळी ७ ते १२ पारायण, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ७:३० ते ९:३० वाजता कीर्तन अश्याप्रकारे दैनंदिन कार्यक्रम राहतील.
शुक्रवार दि. ३१ मार्च रोजी नाना महाराज गागरे, शनिवार दि. १ एप्रिल रोजी बाळकृष्ण महाराज कांबळे यांचे कीर्तन झाले. रविवार दि. २ एप्रिल रोजी उत्तम महाराज गाडे, सोमवार दि. ३ रोजी संदीप महाराज चेचरे, मंगळवार दि. ४ रोजी हेमलताताई पिंगळे, बुधवार दि. ५ रोजी आप्पा महाराज शास्त्री, गुरुवार दि. ६ रोजी आबा महाराज कोळसे यांची कीर्तने होणार आहेत.
गुरुवार दि. ६ रोजी हनुमान जयंती उत्सव साजरा केला जाणार असून दुपारी ३ वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथ मिरवणूक आणि दिंडी प्रदक्षिणा होणार आहे. शुक्रवार दि. ७ रोजी सकाळी १० वाजता श्रीक्षेत्र वेल्हाळे येथील महंत मुक्तानंदगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.




