मुंबई( जनता आवाज वृत्तसेवा ) :- एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडून बसले आहेत. गृहमंत्रिपद मिळाले तरच उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार अशी त्यांची भूमिका आहे.
त्यातच ते आता त्यांचे मुळगाव असलेल्या साताऱ्यातील दरे इथे गेले आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप पहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या भूकंपाचे धक्के कोणाला बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा भूंकप झाला तर त्यात भाजपची सत्ता जाणार यावरच सध्या चर्चेचा खल सुरु आहे.
शिंदे गट बाजुला रहावा यासाठी नेते मंडळींचे प्रयत्न सुरु आहे. महायुतीत फूट पडावी यासाठी महाविकास आघाडीकडून हालचाली सुरु झालेल्या आहेत. शिंदे गटाशी काहीजण जाऊन भेटी घेऊन चर्चा करीत आहेत.