0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

spot_img
spot_img

शनिशिंगणापूरात तीन लाख भाविकांनी घेतले शनिदर्शन 

सोनई (जनता आवाज वृत्तसेवा):- शनिशिंगणापूर येथे दर्श अमावस्या निमित्त भरलेल्या यात्रेस दिवसभरात तीन लाख भाविकांनी भेट देऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. अमावस्या निमित्त शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने वाहनतळ दर्शन व्यवस्था,आरोग्य, रुग्णवाहिका, सुरक्षा, हरवले- सापडले, पिण्याचे पाणी आदी बाबत नियोजन केले होते.

शनिवारी सकाळी १०ः३९ ला अमावस्येस सुरुवात झाली त्यामुळे ११ नंतरच भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर व वाहनांची गर्दी वाढल्यानंतर मुळा कारखाना गट व शनैश्वर रुग्णालय येथील वाहनतळावर वाहने लावून भक्तांना दोन ते तीन किलोमीटर पायी व रिक्षाने जाऊन दर्शन घ्यावे लागले. जय शनिदेव व शनैश्वर भगवान कि जय च्या जयघोषात परीसर दुमदुमला होता.शनिवारी दिवसभर सुरू झालेली गर्दी सायंकाळपर्यंतही मोठ्या प्रमाणात होती पहाटेची आरती माजी खा. चंद्रकांत खैरे व उद्योजक मेहतानी यांच्या हस्ते शनिवार दुपारची आरती उद्योजक सौरव बत्रा व जयेश शहा यांच्या हस्ते व सायंकाळची आरती मेडिकल कौन्सिलचे डॉ राहुल हेगडे, सौरभ बोरा यांच्या हस्ते झाली. देवस्थानच्या वतीने अध्यक्ष भागवत बानकर, चिटणीस आप्पासाहेब शेटे व विश्वस्त मंडळासह कार्यकारी अधिकारी जी के दरंदले, उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आलेल्या भाविकांचे स्वागत केले.शिंगणापुरचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टिंभेकर व देवस्थानच्या सुरक्षारक्षकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. –

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!