9.9 C
New York
Monday, October 27, 2025

Buy now

spot_img
spot_img

पाळणा दुर्घटनेतील जखमींची पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून विचारपूसजखमींवर तात्काळ उपचार करण्याच्या सूचना

*

*शिर्डी दि.१ एप्रिल ( प्रतिनिधी) -* शिर्डी येथील रामनवमी यात्रेनिमित्त प्रसादालयासमोर भरविण्यात आलेल्या जत्रेतील जमिनीवरील फिरता पाळणा निखळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींची जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दूरध्वनीवरून विचारपूस केली आहे.

साईबाबा रूग्णालयात उपचारासाठी दाखल जखमी रूग्णांवर तात्काळ उपचार करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. 

शनिवार, १ एप्रिल रोजी सायंकाळी ८.३० वाजता ही घटना घडली. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत‌. ज्योती किशोर साळवे, किशोर पोपट साळवे यांना अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे ‌. भुमिका साबळे‌ ही किरकोळ जखमी असून प्राथमिक उपचारानंतर तिला घरी पाठविण्यात आले. प्रविण आल्हाट यांना‌ही किरकोळ जखमी झाले आहेत. श्री. साईबाबा रूग्णालयातील वैद्यकीय उपसंचालक डॉ.प्रितम वडगावे यांच्या देखरेखीखाली जखमींवर उपचार सुरू आहेत. राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे व खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे यांच्याकडून दूरध्वनीवरून घटनेची माहिती घेतली आहे. पालकमंत्र्यांनी डॉ.प्रितम वडगावे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधला असून जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. 
पाळणा निखळून पडण्याच्या घटनेनंतर सर्व पाळणे बंद‌ करण्यात आले असल्याचे ही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!