मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):– राज्यात ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे.
मुंबईतील आझाद मैदानमध्ये हा शपथविधी होणार आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होणार आता हे स्पष्ट झाले आहे.भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून याबाबतची माहिती वृत्त सूत्राच्या माहितींनी देण्यात आली आहे. महायुती सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.