14.1 C
New York
Wednesday, December 11, 2024

Buy now

spot_img
spot_img

अहिल्यानगरच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता?

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा ):- गेले काही दिवसापूर्वी विधानसभा निवडणुकीमध्ये  बाळासाहेब थोरात यांच्या पराभव झाला. या  पराभवानंतर त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी आज राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

स्वतः सत्यजित तांबे यांनी याबाबत माहिती दिली. फडणवीस यांच्या भेटीचा एक फोटो सत्यजित तांबे यांनी आपल्या समाज माध्यमांवर पोस्ट केला आहे. समाज माध्यमांवर हा फोटो झळकल्यानंतर अहिल्या नगरच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे

जिल्ह्याच्या राजकारणात आगामी काळात मोठा भूकंप होणार की काय अशा चर्चांना आता ऊत आला आहे. तांबे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले असल्याचे म्हटले आहे.

मात्र तांबे यांच्या या भेटीमुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणूक अपक्ष लढवली होती. तेव्हापासून सत्यजित तांबे आणि त्यांचे वडील माजी आमदार सुधीर तांबे हे काँग्रेस पासून लांब आहेत.

नाशिक पदवीधर निवडणूकीच्या आधी तांबे यांचे काँग्रेस सोबत थोडेसे बिनसले होते. महत्वाचे म्हणजे या निवडणुकीच्या आधीच देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांना सत्यजित तांबे यांना किती दिवस बाहेर ठेवणार, अशा चांगल्या लोकांवर आमचा डोळा असतो असे म्हणत त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते

सत्यजित तांबे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या केमिस्ट्रीची मोठी चर्चा झाली. त्यावेळी तांबे हे भारतीय जनता पक्षात जाणार की काय?काही दिवसापूर्वी सत्यजित  तांबे यांनीही फडणवीस हे आपले मोठे भाऊ सारखेचं आहेत असे जाहीरपणे सांगितले आहे.

पण तरीही तांबे यांनी आमच्या घराण्यात काँग्रेसची विचारसरणी असून आपण ही विचारसरणी सोडणार नाही असे म्हणत भाजपापासून आपण वेगळेचं आहोत असे स्पष्ट केले होते. दरम्यान आता विधानसभा निवडणुकीनंतर अभिनंदनाचे निमित्त म्हणून तांबे पुन्हा एकदा फडणवीस यांच्या भेटीला गेलेत. यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

या भेटीचे फोटो प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्यानंतर आगामी काळात अहिल्यानगर जिल्ह्यात काही मोठा राजकीय भूकंप होणार की काय अशा चर्चा देखील आता सुरू झाल्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!