लोणी ( जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा डाव्या कालव्याच्या नजीक शेतातून गेल्या ५ दिवसांपूर्वी १० ते १२ पानबुडी मोटारी चोरून नेण्याचा प्रकार घडला आहे.
लोणी येथील प्रवरा डाव्या कालव्याच्या दोन्ही बाजूंनी हिरवेगार क्षेत्र जास्त असल्यामुळे रात्रीच्या वेळी तेथील विहिरीवरती असणाऱ्या पानबुड्या मोटारी जास्त प्रमाणात आहे. या भागामध्ये बहुतांशी शेतकरी हे लोणी शहरवस्ती नजीक राहत असल्याकारणाने याच गोष्टीची संधी साधून अज्ञात चोरटयाने गेल्या १ वर्षात दरम्यान ६० ते ७० पाणबुडी मोटार चोरून नेल्या आहेत.
गेल्या आठ महिन्यांमध्ये ही दुसऱ्यांदा घटना घडलेली आहे. याप्रकरणी संशयित चोरांचा शोधा शोध चालू आहे की नाही याची शंका शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे. सदर याप्रकरणी लोणी यांनी काल दुपारी लोणी पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात मोटार चोराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि.वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ. लबडे हे करीत आहेत.



