शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- कोरोना संकट कालावधी पासून शिर्डी साई मंदिरात हार फुले घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु आता माननीय उच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्याने फुल उत्पादक शेतकरी,फुल विक्रेते व समस्त साई भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांचे सर्व शिर्डी ग्रामस्थ तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व धन्यवाद मानले आहेत. डॉ. सुजय विखे पाटील यांनी साई मंदिरात जाऊन साई समाधीवर पुष्पहार अर्पण केला. शिर्डीमध्ये साई मंदिरात हार फुल प्रसाद देण्यास परवानगी मिळाली आहे मात्र हार फुल प्रसाद यांच्या किमती योग्य असाव्यात यासाठी भावफलक लावण्याचे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे शिर्डी मध्ये साई संस्थांनच्या एम्प्लॉईज सोसायटीच्या माध्यमातून प्रवेशद्वार एक जवळ विक्री स्टॉल टाकण्यात आले आहेत.आज गुरुवारी या विक्री स्टॉल्सचे उद्घाटन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
कोरोना संकट कालावधीपासून शिर्डी साई मंदिरात हार फुले घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु आता माननीय उच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्याने फुल उत्पादक शेतकरी,फुल विक्रेते व समस्त साई भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.



