कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार या सीबीएसई शाळेमध्ये आज वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धेचेआयोजन करण्यात आलेले होते.स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी कोल्हार येथील प्रगतशील शेतकरी उद्योजक आणि महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कार्यकारी परिषद सदस्य ऋषिकेश सुनील खांदे पा.प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख विद्यालयाचे प्राचार्य श्री सुधीर मोरे यांनी करून दिली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ऋषिकेश खांदे यांनी खेळाचे जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी मोबाईल वरील गेम मध्ये आपला वेळ वाया न घालवता मैदानावरील कसरतीचे खेळ खेळले पाहिजे त्याचप्रमाणे नियमित व्यायाम हा आरोग्यदायी असल्याची त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. मन,बुद्धी आणि शरीर यांचे उत्तम संतुलन राखण्यासाठी शारीरिक व्यायामाच मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी बऱ्याचदा घरी आल्यानंतर मोबाईल मध्ये व्यस्त असतात. मोबाईलच्या वापराने विद्यार्थ्यांची दृष्टी, पाठीचा कणा,मानेतील हाडे, एकाग्रता इत्यादी बाबींवर अनिष्ट परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा तसेच आपल्या नेतृत्व गुन विकासनासाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी खेळ हा महत्त्वाचा घटक आहे.
बक्षीस विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेडल आणि सर्टिफिकेटचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजनासाठी क्रीडा शिक्षक श्री कदिर शेख यांनी मेहनत घेतली,सूत्रसंचालन सार्थक काळे आणि श्री गोविंद तांबे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु.अस्मिता देवकर हिने मानले.



