लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-बचत गटाच्या चळवळीतून महीलांना सक्षम बनविण्याचे मोठे काम होत आहे.महीलांच्या उत्साही सहभाग चळवळीला बळकटी देत असून, व्यावसायिक ज्ञानातून महीलांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचा आनंद मोठा आहे. स्वयंसिध्दा यात्रेच्या माध्यमातून महीलांना आत्मनिर्भर होण्याची संधी मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केले.
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जनसेवा फाऊंडेशन, लोणी, पंचायत समिती, राहाता, कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वर, कृषि विभाग, पशुसंसंवर्धन विभाग,आत्मा अहिल्यानगर यांच्या वतीने आयोतित राहाता तालुकास्तरीय सक्षम महीला महोत्सव अर्थात स्वयंसिध्दा याञा २०२४ अंतर्गत महीला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुचे प्रदर्शन- विक्री, खाद्य महोत्सव,पशु-पक्षी प्रदर्शन शुभारंभ माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, माजी खा.डाॅ.सुजय विखे पाटील, रणरागिणी महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्री विखे पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सोमनाथ जगताप,अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रदिप लाटे, पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ.सुनिल तुंबारे, ,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.दशरथ दिघे,राहात्याचे तहसिलदार अमोल मोरे,उपविगाय कृ षि अधिकारी विलास गायकवाड,पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भाऊसाहेब अहिरे, कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वरचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख,तालुका कृषि अधिकारी आबासाहेब भोरे,जनसेवेचे सचिव डाॅ.हरिभाऊ आहेर,गिताताई थेटे,डाॅ.संजय घोलप,भारत घोगरे, लोणी बुद्रुकच्या सरपंच कल्पना मैड, प्रकल्प संचालिका रूपाली लोढे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सौ. विखे पाटील म्हणाल्या २०१३ पासून महीलांसाठी सुरु असलेला स्वयंसिध्दा यात्रेचा उपक्रम महीलांसाठी महत्वपूर्ण ठरला आहे. महीलांना वेळोवेळी विविध प्रशिक्षणातून व्यावसायिक धडे दिल्याने आज त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे पाहायला मिळते.आज ग्रामीण महीलांचे सक्षमीकरण होत असल्याचे समाधान वाटते. बचत गटांच्या वेगवेगळ्या व्यवसायामुळे महीलांच्या हाताला काम मिळत असून वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून महीला विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. महीलांच्या सहभागाने बचत गटांची चळवळीला बळकटी मिळत असल्याने यासाठी स्वयंसिध्दा प्रदर्शन उपयुक्त ठरत असल्याचे सौ.विखे म्हणाल्या.महिलांना आज पर्यत १०० ड्रोन मिळाले आहेत.मतदार संघात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे सर्वसामान्य जनतेला विविध योजनेतून लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध खाद्य पदार्थासह, सेंद्रीय भाजीपाला उत्पादन, फळ प्रक्रिया उत्पादन तंत्रज्ञान टाकाऊ पासून टिकाऊ अशा वस्तुची निमिर्ती गटाद्वारे होत असल्याने महीलांचा आत्मविश्वास वाढला आहे. महीलांनी बचत गटाद्वारे एकत्र येत सक्षम व्हावे. आपल्या साठी जनसेवा फौडेशनचे सहकार्य सदैव मिळत राहील असा विश्वास त्यांनी दिला.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील योनी महीला बचत गटांच्या उपक्रमाचे कौतुक करून इतर महीलांनी देखील याद्वारे व्यावसायिक दृष्टीकोने आत्मसात करण्याचे आवाहन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, सोमनाथ जगताप,डाॅ.सुनिल तुंबारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
पंचायत समितीच्या वतीने २३१ कोटी १५ रुपयांचे कर्जाच्या धनादेशाचे वितरण ७२ बचत गटांना करण्यात आले. कृषि विभागाच्या वतीने पिक विमा,कृषि यांत्रिकरण अंतर्गत सहभागी शेतक-यांना फवारणी पंप,ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. सोमवार पर्यत चालणा-या या स्वयंसिध्दा याञेत सर्वासाठी खुला असणार आहे.कार्यक्रमाचे आभार डाॅ.हरीभाऊ आहेर यांनी मानले.



