14.4 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मदतीने केंद्रीय मंत्री स्मृती झुबेण इराणी यांना अंगणवाडी सेविकांचे निवेदन

दिल्ली (विशेष प्रतिनिधी):-अखिल भारतीय अंगणवाडी सेविका फेडरेशनच्या अहमदनगर जिल्ह्यातील ७२ अंगणवाडी सेविका त्यांच्या विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे आल्या असता,खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी त्यांची केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती झुबेन इराणी यांची लोकसभेत भेट घडवून आणली. 
यावेळी आपल्या मागण्या मंजूर करण्याबाबत या अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लेखी निवेदन दिले, या अंगणवाडी सेविकाची मागणी रास्त असून बरेच दिवसा पासून प्रलंबित आहे त्यावर आपण सहनभुती पूर्वक विचार करून त्यांना न्याय द्यावा अशी विनंती खा. विखे यांनी स्मृती इराणी यांच्या कडे केली. 
  मंत्री स्मृती इराणी यांनी या मागण्या बाबत आपण सविस्तर माहिती घेवून निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. 
  दरम्यान थेट केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची भेट होऊन आपल्या मागण्या बाबत त्यांच्याशी चर्चा करता आली याबद्दल अंगणवाडी सेविका फेडरेशनच्या सेविकांनी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!