14.4 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

नगर शहरातील रस्त्यांसाठी १० कोटीचा निधी -खा.विखे पाटील

अहमदनगर दि.२९( प्रतिनिधी):-महापालिके अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी १० कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी असून याबबातचा शासन आदेशही निर्गमित झाला असल्याची माहीती खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

खड्डेमुक्त रस्त्यांकरीता नगर विकास विभागाच्या माध्यमातून विशेष रस्ता अनुदान मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन २५ कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता करून देण्याची विनंती केली होती.यापैकी ५ कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता झाली होती.या निधीचा दुसरा टप्पा म्हणून आता १० कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता करण्यासही नगरविकास विभागाने मान्याता दिली असल्याचे खा डॉ सुजय विखे पाटील म्हणाले.
नगर शहरातील नागरीकांना भेडसावणारी रस्त्यांची समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी खा.विखे पाटील यांनी नगरविकास विभागाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता.मागणी केल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन टप्प्यांमध्ये निधी मंजूर करून केलेल्या सहकार्याबद्दल खा.विखे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे आभार मानले आहेत.
उपलब्ध होणार्या निधीतून शहरातील रस्त्याच्या कामांना गतीने पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.या निधीच्या मंजूरीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खा डॉ सुजय विखे यांनी केलेल्या सहकार्याबदद्ल नगरसेवकांनी तसेच भाजपच्या शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आभार मानले आहेत.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!