13 C
New York
Monday, October 27, 2025

Buy now

spot_img
spot_img

भुजबळ आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

नाशिक (जनता आवाज वृत्तसेवा):- नागपूर मधील हिवाळी अधिवेशन सोडून येवलामध्ये गेले आहेत. छगन भुजबळ आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे छगन भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. नागपूरमध्येच भुजबळांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडेही पाठ फिरवली. त्यानंतर सोमवारी सभागृहात हजेरी लावल्यानंतर त्यांनी नाशिकची वाट धरली. ओबीसी समाजावर पकड असणारे छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ओबीसी संघटनाही नाराज आहेत. आता भुजबळांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ज्येष्ठ माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे. छगन भुजबळ यांना अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, छगन भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोन उचलले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. छगन भुजबळ यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादीकडून काही महत्त्वाचे नेते आज भुजबळ यांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!