संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव घुले येथील बेलसोंडावाडी येथील जळीतग्रस्त मंगल सिताराम घुले यांना आ. अमोल खताळ यांच्या वतीने ब्लॅंकेट ताडपत्री किराणा व धान्य साडीचोळी देत त्या महिलेच्या संसाराला हातभार लावत धीर दिला.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव घुले येथील बेलसोंडावाडी मधील सौ. मंगल सिताराम घुले या दोन दिवसांपूर्वी घरी नसताना अचानक रात्रीच्या वेळी घराला आग लागली होती. या आगीत त्या महिलेचा संसारपयोगी वस्तू सह सर्वच संसार जळून खाक झाला या घटनेची माहिती आ. अमोल खताळ यांना समजतात त्यांनी या महिलेच्या कुटुंबाला हातभार लागावा म्हणून त्या महिलेला मदत करण्याचे ठरविले.
आ. अमोल खताळ यांचे बंधू राहुल खताळ भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शैलेश फटांगरे भाजप युवा मोर्चा संगमनेर शहराध्यक्ष शशांक नामन, सुयोग गुंजाळ, संदेश देशमुख, अनिकेत चांगले, सुयोग जोंधळे, रणजीत गायकवाड, गणेश आंबरे, आयुष चिल्का, अक्षय वर्पे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बेलसोंडावाडी येथे जाऊन मंगल घुले यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले तर आ. अमोल खताळ यांच्या माध्यमातून या महिलेला घरकुल आवास योजनेतून घर कसे मिळेल यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे खताळ यांनी सांगत महिलेला धीर दिला