नेवासा फाटा (प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते.
नगर विकास विभाग अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नेवासा नगरपंचायतीसाठी आमदार शंकरराव गडाख यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून नेवासा शहराच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन नेवासा शहरासाठी व्यापारी शॉपिंग कॉम्प्लेक्स करिता 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याने संपूर्ण नेवासा शहरासह तालुक्यात आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.
वेळोवेळी आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा शहर तसेच नेवासा तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून नगरपंचायत अंतर्गत असंख्य विकास कामे केली. त्यामुळे नेवासा शहराचा आर्थिक दर्जा सुधारून येथे एक उत्तम दर्जेदार व्यापारी बाजार पेठ तयार झाली आहे. असे सर्वसामान्य जनता व व्यापारी यांनी स्पष्ट केले. तसेच आमदार शंकरराव गडाख हे नगरपंचायत मधील विकास कामांसाठी स्वतः पुढाकार घेऊन प्रयत्न करत असतात. या आधीही नगरपंचायत अंतर्गत आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा शहरामध्ये रस्ते, गटारी,पथ दिवे, सभामंडप, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आदी विविध विकास कामे केलेली आहेत. राज्य शासनाकडून शॉपिंग कॉम्प्लेक्स साठी मंजूर करण्यात आलेला हा निधी त्वरित संबंधित कार्यान्वय यंत्रणेला कुठलीही कपात न करता वितरित करण्यात यावा असा आदेश दिला आहे. म्हणून लवकरच या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे पुढील काम सुरू होणार आहे.
हे शॉपिंग कॉम्प्लेक्स पूर्ण तयार झाल्यानंतर व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आमदार शंकरराव गडाख यांच्या पुढाकारातून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी रोजगार मिळून गाळे उपलब्ध होणार आहे .
{आमदार शंकरराव गडाख यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले की नेवासा शहरातील अपूर्ण असलेले भव्य व्यापारी शॉपिंग कॉम्प्लेक्स 2 कोटी रुपयांच्या तरतुदींमुळे पूर्णत्वाला येणार आहे त्यामुळे शहर व परिसरात व्यवसाय वाढीला मदत होणार आहे.}
-आमदार शंकरराव गडाख.





