राहता (प्रतिनिधी):-भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात पारंपारिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारची शेती केली जाते. कृषी विद्यापीठाचे शेती विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. सेंद्रिय शेती एक निसर्ग पूरक स्वयंपूर्ण शेती प्रणाली आहे.
सेंद्रिय शेती काळाची गरज – सौ.शालिनीताई विखे पाटील
जी स्थानिक साधनांचा वापर करते, कमी भांडवली खर्चाच्या तत्त्वावर आधारित सेंद्रिय पदार्थांच्या योग्य वापरामुळे जमिनीची उत्पादकता आणि शाश्वतता वाढवते, जैवविविधता जोपासते,पोषण आणि इतर गोष्टीची पूर्तता करते.सेंद्रिय शेती ही फायदेशीर असून ती काळाची गरज आहे.असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा.सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले. त्या राहाता येथील शिर्डी साई,रुरल,इन्स्टिट्यूटच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात भूगोल विभागाचे “सेंद्रिय शेती”या विषयावरील राष्ट्रीय परिषद तसेच वाणिज्य विभागाचे “डिजिटल मार्केटिंग संधी आणि आव्हाने”या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभ निमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून बोलत होत्या.
त्यापुढे म्हणाल्या सेंद्रिय शेती फायदेशीर होण्यासाठी शेतीचा आवश्यक घटक म्हणजे माती,हवा, पाणी यांचा अधिक प्रभावीपणे विचार करणे आवश्यक आहे. सेंद्रिय खतांचा वापर करून पर्यावरणाचा समतोल देखील राखता येतो.वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषातून तयार झालेल्या सेंद्रिय खतामध्ये शेणखत, गांडूळ खत, हिरवळीचे खत आणि सेंद्रिय पदार्थ पूरक यांचा समावेश होतो. रासायनिक खते व औषधे यांच्या अती वापरामुळे आजच्या काळात आरोग्य धोक्यात आले आहे. त्यासाठी उत्तम पर्याय म्हणून सेंद्रिय शेती आजगरजेची आहे
तसेच आजचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. सर्वांना डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे माहित आहे. डिजिटल मार्केटिंमुळे आपल्याला पाहिजे ती वस्तू आपल्याला घरपोच उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे आपला वेळ सुद्धा वाचतो. डिजिटल मार्केटिंगमुळे विविध क्षेत्रात संधी निर्माण झाली आहे. पारंपारिक मार्केटिंगच्या तुलनेत कमी खर्चात चांगले परिणाम यामध्ये दिसून येतात. त्यामुळे डिजिटल मार्केटिंगची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे जवळपास ८० टक्के खरेदी विक्री डिजिटल मार्केटद्वारे होत असल्यामुळे डिजिटल मार्केटिंगचे महत्व अधिक वाढत आहे. असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रो.डॉ. प्रवीण सप्तर्षी म्हणाले मागील काही दशकात शेतीतून भरपूर उत्पन्नासाठी रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. रासायनिक खते सातत्याने वापरल्यामुळे उत्पादन क्षमता कमी होत आहे. तसेच जमिनीला जास्त पाणी दिल्यामुळे क्षाराचे प्रमाण वाढत चालले आहे. रासायनिक खते व कीटकनाशके यांचाही पर्यावरणावर व पर्यायाने आरोग्यावर परिणाम होतो. आज सेंद्रिय शेतीची समाजाच्या विकासाच्या दृष्टीने खूप आवश्यकता आहे. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भूगोल अभ्यास मंडळाचे सदस्य प्रो.डॉ.अर्जुन मुसमाडे यांनीही मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख उपप्राचार्य डॉ.सुरेश पुलाटे यांनी केले. चर्चासत्राचा हेतू व उद्देश भूगोल विभाग प्रमुख व चर्चासत्र समन्वयक डॉ. दिलीप नलगे यांनी स्पष्ट केला.यावेळी शास्त्रज्ञ योगेश थोरात,डॉ.आर.पी.कळमकर ,डॉ.एस.एल.आरगडे, खडके वाकेचे सरपंच श्री सचिन मुरादे,संस्थेचे डायरेक्टर डॉ.महेश खर्डे ,प्राचार्य डॉ. सोमनाथ घोलप, प्राचार्य युवराज सदाफळ, श्री जालिंदर मुरादे,उपप्राचार्य संजय लहारे, डॉ.दादासाहेब डांगे अंतर्गत मूल्यमापन हमी कक्षचे समन्वयक डॉ.विक्रम भालेकर विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक संशोधक व विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागाच्या प्रमुख डॉ.रोहिणी कासार यांनी तर आभार चर्चासत्र समन्वयक डॉ.राजाराम वाकचौरे यांनी मांनले.





