शिर्डी येथे डीसीसी बँकेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे होते , तर व्यासीठावर आमदार राहुल कुल, जयकुमार गोरे, बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना महाजन म्हणाले की डीसीसी बँक म्हणजे शेतकऱ्याचा आत्मा , जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. अहमदनगर जिल्ह्यात विद्यमान संचालक मंडळाने अशाच प्रकारे योजना एवढंच नव्हे तर ठेवी आणि कारभार अत्यंत सचोटीने केला त्यामुळेच अशा प्रकारची
सहकाराच्या माधयमातूनच शेतकऱ्या कडे सुबत्ता येवू शकते – ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन डीसीसी बँकेच्या शिर्डी शाखेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अधिक सोय होणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी (प्रतिनिधी):-शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकरा शिवाय पर्याय नाही, सहकारातूनच आर्थिक सुबत्ता येवू शकते आणि या करिता जिल्हा मध्यवर्ती बँकेची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे असे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सांगून अहमदनगर जिल्हा प्रमाणेच इतर जिल्ह्यात अशीच सुबत्ता आणण्यासाठी राज्यात आता आपले सरकार आले आहे असे सांगितले.
भव्य इमारत ते उभा करी शकले.या सर्वाचे काम हे कौतुकास्पद असेच आहे. पुढील कार्यास त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की अहमदनगर जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरीच नव्हे तर महिला बचत गटांना देखील कर्ज पुरवठा करून महिलांना आत्मसन्मानाने जगण्यासाठी आम्ही धाडसी पाऊल टाकले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदी शिवाजीराव कर्डिले यांची निवड ही सार्थ असून त्यांच्या अनुभवातून ही बँक अधिकाधिक भरभरटीस जाईल असा मला विश्वास आहे.
प्रारंभी बँकेच्या नूतन वास्तूचे फित कापून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी बँकेचे संचालक, ठेवीदार, शेतकरी सभासद यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी यांची उपस्थिती होती.





