पुणतांबा( जनता आवाज वृत्तसेवा ):- पुणतांबा येथे महादेव मंदिरातील मूर्तीचे विटंबना झाल्याचे ग्रामस्थांच्या आज सोमवारी सकाळी लक्षात आले हनुमान मूर्ती विटंबनाची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा महादेव मंदिरातील मूर्तीची विटंबना झाल्यामुळे पुणतांबेकर ग्रामस्थ आक्रमक झाले ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करून घटनेचे निषेधार्थ पुणतांबा कोपरगाव रस्त्यावर आशा केंद्र चौकात रास्ता रोको आंदोलन केल. दिवसभर गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला बाजार देखील बंद ठेवण्यात आला होता.
गोदावरी काठी यज्ञसेनी देवी मंदिराजवळ व मुदगलेश्वर मंदिराजवळ महादेवाचे घृष्णेश्वर मंदिर असून परिसरातील जागृत देवस्थान म्हणून ते परिचित आहे या मंदिरात रोज भक्तजन पूजा व धार्मिक कार्यक्रम करतात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता महादेवाच्या मंदिरात आत मध्ये महादेवाची पिंड असून मंदिराबाहेर नंदीची मूर्ती आहे.
आज सकाळी पहाटे पाच वाजता सजन मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता पिंडीची व नदीच्या मूर्तीची विटंबना झाल्याचे लक्षात आले गावात माहिती सर्व हिंदू समाज मंदिरा भोवती जमा झाला झालेल्या घटनेची पाहणी करून त्याचा निषेध व्यक्त केला बाबत पोलीस यंत्रणा कळवण्यात आले त्यानंतर शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने व पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर दाखल झाला महादेवाच्या मंदिराची मूर्तीची विटंबना झाल्याचे सर्वत्र समजतात लोकांनी त्रि व संताप व्यक्त करून समाजकंटकावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सकाळी आशा केंद्र चौकात एक तास ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून घटनेचा निषेध व्यक्त केला या रास्ता रोको विश्व हिंदू परिषद बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच हिंदुत्ववादी संघटना तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी मुक्ताई ज्ञानपीठाचे स्वरूप आनंद गिरी महाराज सामील झाले होते यावेळी ग्रामस्थांनी त्रि व संताप व्यक्त करून झालेल्या घटनेचा तपास लवकर लावावा तसेच गावात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्याचा बंदोबस्त करावा अशी संतप्त भावना व्यक्त करून पोलिसांना धारेवर धरले.
यावेळी शिर्डी पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी या घटनेच्या बाबत तपास सुरू असून लवकरच आरोपीला अटक करू अशी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले तीन दिवसांच्या कालावधीनंतर पोलिसांनी तपास न लावल्यास आमरण उपोषण करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला या घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून सहकार्य केले तसेच सोमवारचा आठवडे बाजार देखील बंद ठेवण्यात आला होता.
श्रीरामपूर पोलीस उपअधीक्षक वैभव कुलबर्ग यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली महादेव मंदिरातील विटंबनाच्या ठिकाणी पोलिसांचे श्वान पथक तसेच ठसे पथक येऊन त्यांनी पाहणी केली गेल्या दहा दिवसात दोन मंदिराच्या मूर्तीची विटंबना हिंदू समाजाच्या भावना संतप्त असून आरोपीला लवकरात लवकर अटक करावी ग्रामस्थांनी केली आहे महादेव मंदिरातील मूर्तीची विटंबना झाल्याचे वृत्त तालुक्यात व जिल्हा बाहेर गेले जिल्ह्यातील हिंदुत्वादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणतांबा घेऊन घटनेची माहिती घेतली असा प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी व जागृत राहावे असे आव्हान हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केले आहे.
जिल्हा पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने त्यांचे पथक तसेच दंगल नियंत्रक पथक गावात ठाण मांडून होते तीन दिवसात पोलिसांनी आरोपीचा तपास लावावा अन्यथा गुरुवारपासून आमरण उपोषण करण्यात येणार असून गुरुवारी ग्रामसभा घेऊन त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.