श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर येथील एका घरात चाललेल्या सेक्स रॅकेटचा श्रीरामपूर शहर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी मुलींकडून देहव्यापार करून घेणाऱ्या ५५ वर्षीय महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने श्रीरामपूरात सेक्स रॅकेटचा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
श्रीरामपुर वॉर्ड नं. एक मधील दशमेशनगर परिसरात एक महिला तिच्या घरात बाहेरून मुली आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची तक्रार काही महिलांनी
श्रीरामपूर शहर पोलिसांकडे केली होती. या अर्जाची दखल घेत पोलिस निरिक्षक नितीन देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कारवाई करण्यात आली.
या कारवाईसाठी बनावट ग्राहक आणि दोन पंच घेवून पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्यासह पोलीस फौजफाटा घेवून पो. नि. देशमुख यांच्यासह पोलिसांनी आपले वाहन थोडे लांब उभे करून बनावट ग्राहक बनलेल्या व्यक्तीला ५०० रूपयांच्या ३ नोटा दिल्या. त्यानंतर
ठरल्याप्रमाणे हा बनावट ग्राहक सदर महिलेच्या घरी गेला. त्यानंतर या ग्राहकाने पो.नि. देशमुख यांना मिस कॉल केला. तेव्हा पोलीस पथक सदर महिलेच्या घरी गेले आणि तिला ओळख सांगितली. तेव्हा सदर महिलेसह त्याठिकाणी वैजापूर तालुक्यातील दोन व्यक्ती उपस्थित होत्या. त्यानंतर सदर महिलेकडे स्त्री व ग्राहकांबाबत पोलिसांनी चौकशी करत बेडरूमचा दरवाजा वाजविला, त्यानंतर त्या ठिकाणाहून एक व्यक्ती व एक महिला आढळून आली.
सदरील व्यक्ती पोलिसांना पाहून घाईघाईने कपडे घालून बाहेर आला. त्या ठिकाणी पोलिसांनी घराच्या वरच्या मजल्यावर आणखी एक बेडरूम होता. त्या ठिकाणी पोलीस गेले, तेथे दरवाजा वाजविल्यानंतर बनावट ग्राहक बाहेर आला. त्याबरोबर एक महिलाही होती. पोलिसांनी सदर महिलांकडे चौकशी केली असता सदर घरमालकीन हिने आम्हाला मसाज करण्याकरीता ग्राहक असल्याचे सांगून बोलावले. मात्र आमच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे त्या महिलांनी पोलिसांना सांगितले.
याप्रकरणी पोहेकॉ. मच्छिंद्र किसन शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वृंदा शिरीष ठाकूर (रा. दशमेशनगर, पंजाबी कॉलनी, वॉर्ड नं.1) या महिलेच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.