22.7 C
New York
Tuesday, September 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठवणीला उजाळा देत जिल्ह्यातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली जिल्हा दुष्काळमुक्तीचे डॉ. विखे पाटील यांचे स्वप्न कृतीत उतरण्यासाठी आता ना. विखे पाटलांना मोठी संधी

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी कार्यकर्त्‍यांची एक पिढी घडविली. विचारांच्‍या आधारावर संघर्ष करण्‍याचा संस्कारही दिला. यामुळेच विखे पाटील परिवारावर प्रेम करणा-या समर्थक, कार्यकर्त्‍यांची संख्‍या कमी झाली नाही. जिल्‍हा दुष्‍काळमुक्त करण्‍यासाठी त्‍यांनी पाहीलेले स्‍वप्‍न आता कृतीत उतरण्‍याची मोठी संधी ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या माध्‍यमातून जिल्‍ह्याला मिळाली अशा शब्‍दात जिल्‍ह्यातील मान्‍यवरांनी पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांना आदरांजली अर्पण केली.

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या आठव्‍या पुण्‍यतिथी दिनानिमित्‍त प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात आयोजित केलेल्‍या अभिवादन कार्यक्रमात अनेक वक्‍त्‍यांनी डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या आठवणी जागवून त्‍यांच्‍या कार्यकर्तृत्‍वाचा लेखाजोखा मांडला. जेष्‍ठ नेते आण्‍णासाहेब म्हस्‍के पाटील, जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे, आ.शिवाजीराव कर्डीले, आ.‍काशिनाथ दाते, आ.विठ्ठलराव लंघे, आ.अमोल खताळ, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, डॉ.सुजय विखे पाटील, सौ.शालिनीताई विखे पाटील, यांच्‍यासह राज्‍यासह जिल्‍ह्यातील राजकीय, सामाजिक, सहकार, शिक्षण या क्षेत्रातील मान्‍यवर मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्‍यवरांनी पुष्‍पचक्र अर्पण करुन, अभिवादन केले.

आ.शिवाजीराव कर्डीले यांनी आपल्‍या भाषणात डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍यामुळे १९९५ साली कसा आमदार झालो याची आठवण सांगतानाच कुठलाही राजकीय वारसा नसताना माझ्यासारख्‍या कार्यकर्त्‍यांला त्‍यांनी ही संधी निर्माण करुन दिली. माझ्या राजकीय वाटचालीत विखे पाटील परिवाराचे योगदान मोठे राहीले. प्रश्‍नांच्‍या आधारावर डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी स्‍वत:चे स्‍थान निर्माण केले होते. समाजातील वंचित घटकांना न्‍याय मिळवून देण्‍याचा प्रयत्‍न त्‍यांचा शेवटपर्यंत होता.

आ.काशिनाथ दाते यांनी डॉ.विखे पाटील यांचा मि‍ळालेला सहवास आणि त्‍यांच्‍या लोकसभा निवडणूकांमध्‍ये काम करण्‍याची मिळालेली संधी यामुळेच माझ्यासारखे असंख्‍य कार्यकर्ते राजकीज जीवनात काम करु शकले. पारनेर तालुक्‍या सारख्‍या दुष्‍काळी भागाला पाणी मिळवून देण्‍यासाठी त्‍यांचा अखेरपर्यंत प्रयत्‍न राहीला. गोदावरी आणि कृष्णा खोरे हे दुष्‍काळमुक्‍त करणे हीच त्‍यांच्‍या राजकारणाची प्राथमिकता होती असे स्‍पष्‍ट करुन आता पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी गोदावरच्‍या तुटीच्‍या खो-यात वळविण्‍याचे त्‍यांचे स्‍वप्‍न पुर्ण करण्‍याची संधी ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍यामुळे मिळाली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

आ.अमोल खताळ म्‍हणाले की, माझ्या सारख्‍या तरुण कार्यकर्त्‍याला खासदार साहेबांकडून नेहमीच प्रेरणा मिळाली. त्‍यांचे सातत्‍याने लोकांमध्‍ये राहणे आणि साधी वेषभूषा हेच आमचा आदर्श ठरले. आज माझ्या सारखा कार्यकर्ता विधानसभेपर्यंत पोहोचला ही फक्‍त विखे पाटील परिवाराची देण आहे. सामान्‍य कार्यकर्त्‍यांच्‍या पाठीशी उभे राहणे हीच भावनाया परिवाराने काम जोपासली. ज्‍याला नाही कोणी त्‍याला आहे लोणी या भावनेतूनच संगमनेर तालुक्‍यात मोठे परिवर्तन होवू शकले. संगमनेर तालुक्‍याला दुष्‍काळमुक्‍त करणे हीच खरी आदरांजली खासदार साहेबांना ठरेल. आ.विठ्ठलराव लंघे यांनीही खासदार साहेबांच्‍या संदर्भात आपल्‍या आठवणी सांगून श्रघ्‍दांजली अर्पण केली. या अभिवादन सभेचे प्रास्‍ताविक माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांनी केले.

पुण्‍यतिथी सोहळ्या निमित्‍त स्‍वर सुमानंजली या भक्‍तीगितांच्‍या कार्यक्रमांचे अयोजन करण्‍यात आले होते. प्रवरा उद्योग समुहातील सर्व संस्‍थामध्‍ये आज डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांना अभिवादन करण्‍यात आले. विविध सामाजिक उपक्रमांचे आयो‍जनही करण्‍यात आले होते. लोणी बुद्रूक ग्रामस्‍थांच्‍या वतीने शालेय विद्यार्थ्‍यांना उबदार कपड्यांचे वाटप करण्‍यात आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!