पुणे ( जनता आवाज वृत्तसेवा ):-बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आणि बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड अखेर २२ दिवसांनंतर पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आलेले आहेत. त्यानंतर वाल्मिक कराड यांची खंडणी प्रकरणात सीआयडी कार्यालयात चौकशी सुरु आहे.
आज वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण येणार असल्याने सीआयडीच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. तसेच शरण येण्याआधी वाल्मिक कराडने एक व्हिडीओ पोस्ट करत त्यामध्ये मी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण जाणार आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना माझ्यावर राजकीय द्वेषापोटी ही कारवाई करण्यात आली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात माझा सहभाग असल्यास न्यायदेवता मला जी शिक्षा देईल ती मान्य असेल, असे त्यांनी म्हटले होते.