spot_img
spot_img

मी संजय सिंघानिया आहे, माझी मेमरी शॉर्ट टर्म – आ. सुरेश धस

मुंबई ( जनता आवाज वृत्तसेवा ):-बीडच्या मस्साजोग हत्याकांडाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेला वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड मानला जातो. सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस या दोघांचाही नामोल्लेख छोटा आका व मोठा आका असे करतात. त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव अद्याप घेतले नाही. पत्रकारांनी एका मुलाखतीत त्यांना याविषयी छेडले असता त्यांचे मिश्किल उत्तर दिलेत्यांचा रोख वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्याकडे असतो. पण ते केव्हाच मुंडे यांचे नाव थेटपणे घेत नाहीत. याविषयी पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला असता त्यांनी त्याला अत्यंत भन्नाट उत्तर दिले. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

आकाचे आका धनंजय मुंडे असतील तर तुम्ही नाव घ्यायला का घाबरता? असा प्रश्न पत्रकारांनी सुरेश धस यांना केला. त्यावर धस म्हणाले, मी संजय सिंघानिया आहे. माझी मेमरी शॉर्ट टर्म आहे. तुम्ही गझनी चित्रपट पाहिलाय का? मला कधी कधी त्यांचे नाव आठवत नाही. फक्त आकाचे आका एवढेच आठवते. त्यांचे हे मिश्किल उत्तर ऐकूण उपस्थित सर्वच पत्रकारांत हशा पिकला.

ते पुढे म्हणाले, गझनी चित्रपटात शॉर्ट टर्म मेमरी १५  मिनिटांची दाखवण्यात आली होती. पण ती ५ मिनिटांची देखील असते ना. ५ मिनिटांपूर्वी मी बोलत होतो, तेव्हा त्यांचे नाव माझ्या लक्षात होते, पण आता ५  मिनिटांनी ते विसरलो. त्यांचा हा युक्तिवाद ऐकूण उपस्थितांत आणखी खसखस पिकली.

यावेळी त्यांना तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, म्हणून तुम्हाला मुंडेंचे नाव घेऊ नका असे सांगण्यात आले आहे का? असा आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, या प्रकरणात विरोधी पक्षातील नेतेही बोलत आहेत. आम्ही सत्ताधारी असलो तरी एवढ्या क्रूर पद्धतीने एखाद्या व्यक्तीला मारले जात असेल तर मी गप्प बसणार नाही असे ते म्हणाले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!