spot_img
spot_img

कोल्हारच्या विद्यार्थ्यांचा ‘डायनॅमिक सायकल’ तालुक्यात अव्वल लोणी येथे झालेल्या तालुकास्तरीय तंत्र प्रदर्शनामध्ये मिळविला प्रथम क्रमांक 

कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालयातील तांत्रिक विभागाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी समर्थ धनंजय शिरसाठ याने तयार केलेला डायनॅमिक सायकलचा प्रोजेक्ट लोणी येथे झालेल्या तालुकास्तरीय तंत्र प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मिळाला. 

या विद्यार्थ्यांला तांत्रिक विभागाचे शिक्षक पवार एस. आर., जाधव आर. एस., चव्हाणके आर. डी., मुख्याध्यापिका संजीवनी आंधळे, प्र. पर्यवेक्षक शब्बीर शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाच्या प्र. मुख्यध्यापिका संजीवनी आंधळे, प्र. पर्यवेक्षक शब्बीर शेख, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष अॅड. सुरेंद्र खर्डे पाटील, जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के, सदस्य बी. के. खर्डे, अजीत मोरे, अशोक आसावा, रविंद्र देवकर, विभागीय अधिकारी बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी नाईकवाडी, श्री. तोरणे यांसह सर्व शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!