14.3 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

कर्जत-जामखेड मतदारसंघातील १० हजार गरजू शालेय विद्यार्थ्यांना होणार मोफत सायकलचे वाटप

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम राबवून आमदार रोहित पवार हे आपल्या मतदारसंघात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कायमच प्रयत्नशील असतात. अशातच आता आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व बारामती ऍग्रो लिमिटेड आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या सहकार्याने तब्बल १० हजार गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवारही उपस्थित असणार आहेत.           

कर्जत शहरातील फाळके पेट्रोल पंपा शेजारील मैदानावर हा सोहळा 26 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता आयोजित करण्यात आलेला असून सर्व लाभार्थी पाचवी ते दहावीपर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात येणार आहे. पर गावाहून वाड्या-वस्त्यांवरून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात काही ठिकाणी एसटीची ही सोय नसते आणि सायकल घेऊन देण्याची कुटुंबाची परिस्थिती नसते. अशा परिस्थितीचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊन त्यांच्या उज्वल भवितव्यावरही विपरीत परिणाम होत असतो हीच गोष्ट लक्षात घेऊन गरजू विद्यार्थ्यांना सायकल देऊन त्यांची शाळेत येण्या-जाण्याची सोय व्हावी व शाळेत येण्या-जाण्याचा वेळ वाचावा या उद्देशाने आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून गरजू विद्यार्थ्यांना सायकल देण्यात येणार आहेत. 
विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक प्रवाहात राहावं, शिक्षण घेत असताना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी आमदार रोहित पवार हे वेळोवेळी वैयक्तिक लक्ष देऊन असतात. मतदारसंघात अनेक शाळांमध्ये दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करून विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतं. किंवा मिळेल त्या वाहनाने प्रसंगी प्रवास करावा लागतो. यामुळे आता सायकल उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची ओढ आणखी वाढेल शिवाय त्यांना होणारा शारीरिक आणि मानसिक त्रासही या माध्यमातून कमी होणार आहे.
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून पार पडणाऱ्या अनोख्या सोहळ्यास विरोधी पक्षनेते अजितदादा पवारही राहणार उपस्थित
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!