कोल्हार ( वार्ताहर ) :- रयत प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागात एकूण ४७ विद्यार्थी या परीक्षेसाठी शिष्यवृत्तीधारक झाले असून यामध्ये कोल्हार बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालयातील सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले.
रयत प्रज्ञाशोध परीक्षेत कोल्हारच्या न्यू इंग्लिश स्कूलचे ६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
यामध्ये कु. ऋचा अखिल राऊत, कु. स्नेहा संदिप भालके, कु. आचल विलास रांधवणे, कु. सिद्धी राजेंद्र मतकर, कु. कार्तिकी गंगाराम मुसमाडे, प्रणित मदन पगार हे विद्यार्थी – विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक झाले.
या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. व्ही. वाघमारे, उपमुख्याध्यापक ए. डी. गो-हे, पर्यवेक्षिका श्रीमती एस. बी. आंधळे, या परीक्षेचे प्रमुख बी.आर. धनवडे, एस. ई. फुलारी, सौ. एस. एस. काळे, सौ. आर. एस. फुलारी, एस. सी. खंडागळे, ए. डी. बानकर, श्रीमती ए. एस. लहामगे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष अॕड. सुरेंद्र खर्डे, अशोक आसावा, भाऊसाहेब शिरसाठ, बी.के. खर्डे, संजय शिंगवी, अजित मोरे, वसंत खर्डे, सुनील भणगे, सुजित राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रामदास तांबे यांनी केले व शब्बीर शेख यांनी अभार मानले.
तसेच विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सौ. अनुराधाताई सुरेशराव पाटणकर यांनी विद्यालयात मुलींच्या स्वच्छतागृह बांधकामासाठी देणगी दिली. या देणगीमधून बांधण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहाचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले.





