श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- येथील नगरपालिका शाळा क्रमांक,शाळा क्रमांक नऊच्या माजी मुख्याध्यापिका शेख नाजिया अब्दुल रहमान यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय महिलासंमेलनात फातिमा शेख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय संपन्न झालेल्या या शानदार कार्यक्रमास राज्यभरातून महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमात राज्यभरातील १४ महिलांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मीनाताई जगधने,आमदार रोहित पवार,विद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय नगरकर,महाविद्यालय विकास समितीचे सर्व पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
नाझिया शेख यांनी तंत्रस्नेही शिक्षिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे त्यांचे स्वतःचे चॅनेल देखील आहे त्याचबरोबर विज्ञान पदवीधर शिक्षक म्हणून त्यांनी सादर केलेल्या उपकरणास तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नुकताच द्वितीय क्रमांक देखील प्राप्त झाला आहे.एक कार्यक्षम मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून फातिमा शेख यांच्या नावाने दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.फातिमा शेख पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध थरातून अभिनंदन होत आहे.



