नेवासा (प्रतिनिधी):-नेवासा पंचायतसमिती सदस्य व शिवसेना नेते दिवंगत सुनील ऊर्फ अण्णा चिमाजी लष्करे यांच्या हत्याप्रकरणी औरंगाबाद येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या विरोधात आरोपी राजू जहागिरदार, मुन्ना जहागिरदार, जावेद शेख, मुन्ना पठाण, सर्फराज सईदने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाच्या न्या. आर. एम. जोशी व न्या. आर. जी. अवचट यांनी फेटाळत जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.





