14.3 C
New York
Friday, October 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

संगमनेरच्‍या ध्रुव अकॅडमी संस्‍थेतील विद्यार्थ्‍यांनी सादर केलेले ‘रामायण’ महानाट्य

शिर्डी दि.२५ (प्रतिनिधी):-संगमनेरच्‍या ध्रुव अॅकॅडमी संस्‍थेतील विद्यार्थ्‍यांनी सादर केलेले  ‘रामायण’ महानाट्य शिर्डीच्‍या महापशुधन एक्‍सपोमध्‍ये सर्वांचीच दाद मिळवून गेले. रामायणातील प्रत्‍येक प्रसंगाला उपस्थितांच्‍या ‘जय श्रीराम’ या घोषणेच्‍या  मिळालेल्‍या प्रतिसादामुळे सांस्‍कृतीक कार्यक्रमाचे वातावरण पुर्णपणे राममय होऊन गेले.


मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पुढाकाराने पशुसवंर्धन विभागाच्‍या वतीने ३ दिवसांचे भव्‍य असे महाप्रदर्शन आयोजित करण्‍यात आले आहे. देशासह राज्‍यातील शेतकरी, पशुपालक आणि शेतीपुरक व्‍यवसाय करणारे तरुण शेतकरी या महाप्रदर्शनात सहभागी झाले आहेत. जिल्‍ह्यासह राज्‍यातील विविध भागातून शेतकरी हे प्रदर्शन पाहण्‍यासाठी शिर्डीत दाखल होत आहेत.

येणा-या प्रत्‍येकासाठी श्रीक्षेत्र शिर्डी हे साईबाबांचे समाधी स्‍थळ हे मुख्‍य आकर्षण आहेच परंतू या प्रदर्शनातही सांस्‍कृतीक कार्यक्रमांची पर्वणी सहभागी शेतक-यांना मिळावी म्‍हणून खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या संकल्‍पनेतून विविध सांस्‍कृतीक कार्यक्रमांचे आयोजनही करण्‍यात आले आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने प्रबोधनकार निवृत्‍ती महाराज देशमुख यांच्‍या किर्तनापासून ते मराठी वाहीनी वरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील कलाकारांची हजेरी या सांस्‍कृतीक व्‍यासपीठावर मुख्‍य  आकर्षण असणार आहे.
या महाप्रदर्शनातील सांस्‍कृतीक कार्यक्रमाचा पहिला दिवस मात्र संगमनेरच्‍या ध्रुव अॅकॅडमी मधील विद्यार्थ्‍यांनी चांगलाच गाजविला. अॅकॅडमीचे संचालक डॉ.संजय मालपाणी यांच्‍या संकल्‍पनेतून सुमारे ३०० विद्यार्थ्‍यांचा सहभाग असलेले ‘रामायण’ महानाट्य सादर करण्‍यात आले. रामायणातील प्रत्‍येक प्रसंग विद्यार्थ्‍यांनी सादर करुन, या महाप्रदर्शनातील महोलच संपूर्णपणे राममय करुन टाकला. उत्‍कृष्‍ठ संवाद, प्रसंगानुरुप गाणी आणि नियोजनबध्‍द, लयबद्द पध्‍दतीने विद्यार्थ्‍यांनी सादर केलेला रामायणातील प्रत्‍येक प्रसंगी उपस्थितांना खेळवून ठेवणारा होता.
प्रभु श्रीरामचंद्रांना वणवासात जाण्‍यापासूनचा प्रसंग ते पुन्‍हा  आयोध्‍या नगरीतील त्‍यांच्‍या राज्‍याभिषेका पर्यतंचे सर्व प्रसंगी विद्यार्थ्‍यांनी भावना प्रदान पध्‍दतीने सादर केले. विद्यार्थ्‍यांच्‍या या प्रत्‍येक प्रसंगाला उपस्थितांना टाळ्या आणि जय श्रीरामच्‍या घोषणांनी अक्षरक्ष: डोक्‍यावर घेतले.
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सहभागी विद्यार्थ्‍यांचे कौतुक करुन, हे महानाट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्थितीत आयोध्येमध्‍ये सादर करण्‍याची ग्‍वाही दिली. जिल्‍ह्यातील विद्यार्थ्‍यांमध्‍ये  असलेले कलेचे कौशल्‍य हेरुन डॉ.संजय मालपाणी यांनी सादर केलेल्‍या या महानाट्याची संकल्‍पना सादर करण्‍याचा मान श्री.साईबाबांच्‍या शिर्डी नगरीला मिळाला असल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन नमुद केले. प्रभु श्रीरामचंद्रांचे चित्र असलेली शाल जनसेवा फौंडेशनने नुकतीच तयार केली असून, या शालीचे विमोचनही या महानाट्या प्रसंगी करण्‍यात आले. ही शाल आणि स्‍मृतीचिन्‍ह देवून जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी डॉ.संजय मालपाणी यांचा गौरव केला.
अवघ्‍या काही दिवसांवर श्रीराम नवमी चा उत्‍सव येवून ठेपला आहे. श्रीसाईबाबांच्‍या शिर्डीत या उत्‍सवाचे असलेले महत्‍व आणि परंपरा पाहाता शिर्डीत सादर झालेले रामायण महानाट्य शिर्डी नगरीचे वातावरण राममय होण्‍यास उपयुक्‍त ठरले आहे. सर्व शासकीय आधिका-यांसह शिर्डी शहरातील नागरीक, अबाल वृध्‍द, शेतकरी हे महानाट्य पाहण्‍यास मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
 या महानाट्या पुर्वी झी मराठी वाहीनीवरील लिटील चॅम्‍स या स्‍पर्धेत यशस्‍वी झालेला गायक सारंग भालके यांनी गितरामायणातील गाणी सादर केली. या गाण्‍यांना सत्‍यजित सराफ, प्रशांत तिवारी, प्रविण उबाळे यांनी साथसंगत केली.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!