पाथरे ( जनता आवाज वृत्तसेवा ):- जिल्हा परिषद अहिल्यानगर, पंचायत समिती राहाता, गणित व विज्ञान संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा तालुका स्तरीय कृतिशील विज्ञान शिक्षक पुरस्कार २०२४ लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पाथरे बुद्रुक येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. संदीप म्हस्के यांना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.
नुकतीच त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने वनस्पतीशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, ज्येष्ठ विस्तार अधिकारी विष्णू कांबळे, केंद्र प्रमुख कानिफनाथ कोळेकर, प्राचार्य बारगुजे , शशिकांत घोलप, लक्ष्मण घोलप, सरपंच उमेश घोलप, भाऊसाहेब घोलप ,अशोक कडू , आरिफभाई शेख, आण्णासाहेब कडू, सौ. वैशाली रोकडे, श्री. संजय उंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्या बद्दल जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी खा. सुजय विखे पाटील, डॉ. सुष्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे उपप्राचार्य वाणी मॅडम व सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी डॉ. संदीप म्हस्के यांचे अभिनंदन केले.



