spot_img
spot_img

कोल्हार आरोग्य केंद्रात रक्तदान महायज्ञ उत्साहात

कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- जगद्गुरु स्वामी श्री. नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नानिजधाम यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे रक्तदान महायज्ञ या सामाजिक उपक्रमाचे आयोजन कोल्हार सेवा केंद्र समिती यांच्या वतीने कोल्हार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी उत्साहात संपन्न झाले.

रक्तदान शिबिरास कोल्हार व परिसरातील तमाम नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून योग्य प्रतिसाद दिला.तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा.. या जगद्गुरु श्रींच्या शिकवणुकीतून रक्तदान महायज्ञाचे महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये दरवर्षी आयोजन करण्यात येते. गतवर्षी देखील सुमारे एक लाख  रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात येऊन भारताच्या सीमेवरील जवानांना ते समर्पित करण्यात येते.. यासाठी संस्थानाने “ब्लड इन निड”या सामाजिक उपक्रमांतर्गत सदरचे कार्य चालत आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन भगवतीपुर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष श्री.भाऊसाहेब दादा खर्डे पा.यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रवरा बँकेचे माजी व्हा.चेअरमन अशोकशेठ असावा, उपाध्यक्ष साहेबराव दळे, विश्वस्त विजयराव निबे, प्रवरा बँकेचे संचालक पंढरीनाथ खर्डे,राजेंद्र राऊत, दिलीप शेळके, आबासाहेब राऊत,अजय खर्डे,आबासाहेब खर्डे, गोरख खर्डे,कैलासराव चिंधे सर, सुनील बोरुडे,शिर्डी लोकसभा शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या प्रमुख सुनिता शेळके, शिवसेना तालुका महिला अध्यक्ष अर्चना निबे, आदी उपस्थित होते. रक्तदानाचे मानवी जीवनात असलेले महत्त्व आपल्या भाषणात श्री कैलास चिधे यांनी विशद केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवींद्र लोळगे,सोमेश्वर घोगरे,राजु घोटकुले,अशोकराव भवार, बाबासाहेब होन,संदीप सुरासे,ज्ञानेश्वर लांडगे,सोमनाथ येवले,प्रदीप दंडवते,शिवनाथ लोहारकर,अशोकराव गागरे,रिकेश जाधव सौ.बेबीताई आहेर,सौ.मंगल भवार सौ.मंगल निबे,जया ताई पठारे,सौ.सुनीता काशीद सौ.हिराबाई भवार,भारती घोटकुले,सौ.ज्योती शिंदे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रीकांत बेद्रे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. केतन लोळगे यांनी केले.दरम्यान एकूण ११५ रक्त बॅगांची संकलन कोल्हार येथील रक्तदान महायज्ञात झाले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!