नेवासा फाटा:महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दंत वैद्यकीय शाखेच्या अभ्यास मंडळ निवडणुकीचा निकाल २० मार्च रोजी जाहीर करण्यात आला. अभ्यास मंडळ (प्री क्लिनिकल पदवी आणि पदव्युत्तर ) करिता डॉ. दिनेश राजपूत यांची बिनविरोध निवड झाली.
यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयाला या निवडीमुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे. महाविद्यालयाचे संस्थापक मा. खा. यशवंतरावजी गडाख साहेब, उपाध्यक्ष कु. नेहलताई गडाख, डॉ. सुभाष देवढे पाटील, मा. डॉ. शरद सांब व महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. निलिमा राजहंस यांनी अभिनंदन केले आहे.