नेवासा फाटा : उसाच्या भुसाचा ट्रॅक्टर रस्त्यात पलटी झाल्यामुळे एक तास ट्रॅफिक जाम.
उसाच्या भुसाचा ट्रॅक्टर रस्त्यात पलटी झाल्यामुळे एक तास ट्रॅफिक जाम
नेवासा फाटा येथील प्रसिद्ध माणिकराव वाडेवाले यांचे दुकानासमोर सायंकाळी सहाच्या सुमारास उसाचा भुसा भरलेला ट्रॅक्टर अचानक ट्रॅक्टरचा अक्षल तुटून रस्त्यातआडवा होऊन झालेल्या अपघातामुळे छत्रपती संभाजीनगर – अहमदनगर महामार्गावर वाहनाची दुतर्फा लाईन लागून १ तास रस्ता जाम झाला.नेवासा फाट्यावर नेहमीच या ना त्या कारणाने ट्रॅफिक जाम असते. आज झालेल्या प्रकारामुळे प्रवाशांची मोठी कुचंबना झाली. ही घटना पाहण्याकरता प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. जेसीबीने भुसा बाजूला करुन क्रेनने ट्रॉली आणि ट्रॅक्टर उचलला. आणि ट्रॅफिक सुरळीत केली. तोपर्यंत नेवासा शेवगाव या मार्गावरील ही दोन्ही बाजूने वाहनांची गर्दी झाली होती. ट्रॅक्टरच्या चुकीमुळे ये जा करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही.