गोगलगाव (जनता आवाज वृत्तसेवा ):-खा. बाळासाहेब विखे पाटील विद्यालय गोगलगाव ता. राहाता, जि. अहिल्यानगर या विद्यालयाचा सप्टेंबर- 2024 मध्ये झालेल्या शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा-2024 इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयाचा निकाल शेकडा 100% लागला आहे.
या निकालामध्ये A ग्रेडमध्ये दोन तर C ग्रेड मध्ये दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. कु. सातकर वैष्णवी गोकुळ,कु. सोनवणे वैष्णवी चंद्रभान या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना एस.एस.सी परीक्षेमध्ये वाढीव सवलतीचे गुण मिळणार आहेत. या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य श्री के.एम.म्हस्के सर कलाशिक्षक श्री.शिंदे सर,
यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील (मंत्री, जलसंपदा महाराष्ट्र राज्य) अहिल्यानगर जि.प.च्या मा.अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, अहिल्यानगरचे माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील,संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिताताई विखे पाटील ,शिक्षण संचालिका, सौ.लीलावती सरोदे स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष रामभाऊ गंगाधर पा. गुळवे ,सरपंच, प्राचार्य के.एम.म्हस्के सर्व शिक्षक- शिक्षिका,पालक,ग्राम स्थ आदींनी अभिनंदन केले आहे.



